हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Post Office : जर आपल्याला चांगला रिटर्न देणारा सुरक्षित पर्याय शोधत असाल तर आजची ही वाटणी आपल्यासाठी उपयुक्त ठरेल. कारण आज पोस्ट ऑफिसच्या एका अशा योजनेबाबतची माहिती जाणून घेणार आहोत ज्यामध्ये गुणत्मवूक करून चांगला नफा मिळू शकेल. तर बँकेप्रमाणेच पोस्ट ऑफिसकडूनही एक वर्ष, दोन वर्षे, तीन वर्षे आणि पाच वर्षांसाठी फिक्स्ड डिपॉझिट्स स्कीमची सुविधा देते. ज्याला टाइम डिपॉझिट असे म्हंटले जाते. या योजनेला पोस्ट ऑफिस एफडी असेही म्हणतात. या टाइम डिपॉझिटवर वेगवेगळ्या कालावधीनुसार वेगवेगळे व्याजदर दिले जातात.
सरकारकडून नुकतेच टाइम डिपॉझिट स्कीमच्या व्याजदरात 30 बेसिस पॉइंट्सने वाढ केली होती. आता या योजनेमध्ये गुंतवणूकदाराला वार्षिक 7 टक्क्यांपर्यंत व्याज दिले जात आहे. या योजनेची विशेष बाब म्हणजे यामध्ये गुंतवणूकदाराला अल्पकालीन आणि दीर्घकालीन गुंतवणूक करण्याची संधी दिली जाते. Post Office
टॅक्समध्येही मिळेल सूट
यामध्ये 1 वर्षापासून 5 वर्षांपर्यंत गुंतवणुकीचा पर्याय देखील उपलब्ध आहे. यामध्ये एक लाख रुपये एकरकमी जमा करून मॅच्युरिटीवर मजबूत रिटर्न मिळेल. त्याबरोबरच इन्कम टॅक्स कायद्याच्या कलम 80C अंतर्गत 5 वर्षांच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवर कर सवलतीचा दावा देखील करू शकता. Post Office
कोणाकोणाला खाते उघडता येईल
Post Office च्या या स्कीममध्ये कोणत्याही भारतीय नागरिकाला आपले खाते उघडता येतील. यामध्ये 1,000 रुपये गुंतवून खाते देखील उघडता येते. तसेच 3 प्रौढ व्यक्ती एकत्रित खाते देखील उघडू शकतील. त्याच प्रमाणे 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांच्या नावाने त्याच्या पालकांना टाइम डिपॉझिट खाते देखील उघडता येईल.
7% पर्यंत व्याज
Post Office च्या टाइम डिपॉझिटमधील गुंतवणुकीच्या वेगवेगळ्या कालावधीसाठी वेगवेगळे व्याजदर निश्चित करण्यात आले आहेत. जर एखाद्या गुंतवणूकदाराने या योजनेमध्ये 5 वर्षांसाठी पैसे जमा केल्यास त्यावर वार्षिक 7 टक्के दराने व्याज मिळेल. तीन वर्षांची फिक्स्ड डिपॉझिटकरून गुंतवणूकदाराला 6.9 टक्के दराने व्याज दिले जाईल. त्याचप्रमाणे 2 वर्षांच्या फिक्स्ड डिपॉझिटवर 6.8 टक्के व्याज दिले जात आहे. सर्वात कमी व्याज म्हणजेच 6.6 टक्के व्याज एका वर्षाच्या फिक्स्ड डिपॉझिटवर दिले जात आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या :https://www.indiapost.gov.in/Financial/pages/content/post-office-saving-schemes.aspx
हे पण वाचा :
Multibagger Stocks : अवघ्या वर्षभरात ‘या’ 6 स्मॉल कॅप शेअर्सनी दिला दुप्पट रिटर्न
Digital Gold : आता फक्त 1 रुपयात खरेदी करता येईल सोने, जाणून घ्या त्यासाठीची प्रक्रिया
HDFC Bank ने ग्राहकांना दिला मोठा धक्का, ग्राहकांच्या EMI मध्ये झाली वाढ
SBI च्या सर्वोत्तम FD योजनेअंतर्गत ग्राहकांना दिला जातोय सर्वाधिक व्याज दर
PNB खातेधारकांसाठी महत्वाची बातमी! बँकेकडून चेक पेमेंटच्या नियमांत बदल