पुण्यातील कुमठेकर रोडवर बसचा ब्रेक फेल होऊन भीषण अपघात, अनेकजण जखमी

pune crime
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यातील कुमठेकर रोडवर बसचा ब्रेक फेल होऊन एक भीषण अपघात (Accident) घडला आहे. यामध्ये गाड्या एकमेकांवर आदळून हा अपघात (Accident) घडला आहे. या अपघातात अनेकजण जखमी झाले आहेत. 2 ते 3 जण जखमी झाले असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींकडून देण्यात आली आहे. तसेच या अपघातात 7 ते 8 वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

पुण्यात अपघाताचे प्रमाण गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या अपघाताची कारणे वेगवेगळी असली तरी तरी त्याचा फटका मात्र नेहमीच पुणेकरांना बसत आहे. कधी वाहन चालकाच्या चुकीमुळे तर कधी वाहनातील बिघाडामुळे हे अपघात होत असतात.

या अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघाताची (Accident) पाहणी केली आहे. गर्दीच्या ठिकाणी हा अपघात घडल्याने नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हे पण वाचा :

Nexon EV Max : एका चार्जमध्ये 437 किमी धावणार Tata ची ‘ही’ गाडी

रवींद्र जडेजाला डबल धक्का ! पहिले कर्णधारपद गेले, आता थेट आयपीएलमधून बाहेर

Mukesh Ambani च नाही तर त्यांचे शेजारीही आहेत अब्जाधीश, त्यांच्या शेजारी कोण-कोण राहतात ते पहा

Google Play Store Policy : आजपासून ‘कॉल रेकॉर्डिंग’ चे सर्व App होणार बंद

राष्ट्रवादीने काँग्रेसच्या पाठीत सुरा खुपसला; नाना पटोलेंचा हल्लाबोल