Business Idea : ‘या’ तीन प्रकारच्या झाडांच्या पानांची लागवड करून मिळवा भरपूर पैसे !!!

Business
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Business Idea : देशात अनेक प्रकारच्या पानांचा मोठ्या प्रमाणावर व्यापार केला जातो. यापैकी, केळी आणि सुपारीची पाने सर्वात महत्वाची मानली जातात. कारण त्याचा देशभरात वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. आज आपण आणखी एका अशा महत्वाच्या पानाबाबत माहिती करून घेणार आहोत, ज्याच्या लागवडीद्वारे आपल्याला भरपूर पैसे मिळवता येतील. चला तर मग आज आपण सखूच्या पानांबद्दलची माहिती जाणून घेउयात…

वर उल्लेख केलेल्या तीनही झाडांची लागवड करून आपल्याला भरपूर पैसे कमवता येतील. हे लक्षात घ्या कि, केळीच्या पानांना दक्षिण भारतात खूप जास्त मागणी असते. तर सुपारीच्या पानांना उत्तर आणि पूर्व भारतात भरपूर मागणी असते. त्याच प्रमाणे सखूची पाने ही डोंगराळ भागात केळीच्या पानांप्रमाणेच वापरली जातात. चला तर मग या पानांबाबत सविस्तरपणे जाणून घेऊयात… Business Idea

Eating on Banana Leaves has Bunch of Benefits | Fusion – WeRIndia

केळीची पाने

सामान्यतः केळीची झाडे ही केळींसाठी लावली जातात. केळींमुळे चांगले उत्पन्न देखील मिळते. मात्र केळीचे पान हे देखील उत्पन्नाचे मोठे साधन आहे. हे लक्षात घ्या कि, दक्षिण भारतातील अनेक घरांमध्ये खास प्रसंगी जेवणासाठी केळीची पाने वापरली जातात. त्यामुळे त्या भागात केळीची पाने विकून आपल्याला पैसे कमवता येतील. यासाठीची सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे या पानांच्या देखभालीसाठी खर्चही येत नाही. तसेच जो थोडा काही खर्च होईल तो केळीच्या विक्रीतून वसूल केला जाईल. ज्यामुळे आपल्याला दुप्पट नफा मिळेल. Business Idea

Betel Leaf Farming : सुपारी पान मळ्यांची शेती करायची कशी? जाणून घ्या  कृषितज्ञांचे मत | How to manage leaf farming, what is the advice of  agronomists | TV9 Marathi

सुपारी

भारतात जवळपास सर्वच ठिकाणी सुपारीची पाने वापरली जातात. भारताच्या उत्तर आणि पूर्व भागात तर त्याला बारमाही भरपूर मागणी असते. याबरोबरच दक्षिण भारतातही याला मोठी मागणी असते. मात्र हे लक्षात असू द्यात कि, हे नगदी पीक असल्याने त्याची लागवड करणे थोडे अवघड असते. मात्र एकदा पीक घेतल्यावर आपल्याला त्याकडे कित्येक महिने लक्ष द्यावे लागत नाही. Business Idea

28,467 Banana Leaf Stock Photos, Pictures & Royalty-Free Images - iStock

सखुचे पान

डोंगराळ भागात हे झाड जास्त प्रमाणावर आढळून येते. या पानांचा वापर देखील केळीच्या पानांसारखाच केला जातो. सखूच्या झाडाची फक्त पानेच नाही तर याच्या लाकडाला देखील चांगलीच किंमत मिळते. म्हणजेच या एका झाडापासून आपल्याला दोन प्रकारे कमाई करता येईल. या झाडाची लागवड मुख्यतः उत्तर भारतात केली जाते. Business Idea

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.mudra.org.in/

हे पण वाचा :

Multibagger Stock : एका वर्षात ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांना दिला 5 पट नफा !!!

SBI च्या ग्राहकांसाठी खुशखबर !!! आता FD वरील व्याजदरात होणार वाढ

HDFC कडून व्याजदरात वाढ !!! आता होम लोन महागणार, नवे दर पहा

PM Kisan : आता फक्त ‘ही’ अट पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांनाच दिला जाणार 12 वा हप्ता

आता ICICI Bank च्या फिक्स डिपॉझिटवर मिळणार जास्त व्याज, नवीन दर जाणून घ्या