हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Business Idea : व्यवसाय करण्यासाठी अशी उत्पादने शोधायला हवी ज्यांना वर्षभर आणि प्रत्येक हंगामात मागणी असेल. त्यामुळे जर कोणाला स्वतःचा व्यवसाय सुरू करून मोठा नफा कमवायचा असेल तर आज आपण अशाच एका व्यवसायाबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यासाठी वर्षभर मागणी आहे आणि ते प्रत्येक ऋतूमध्ये वापरले जाते. तसेच सर्व वयोगटातील लोकांकडून ते खाल्ले जाते.
तर आज आपण काजूच्या शेतीविषयी जाणून घेणार आहोत. काजू लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. तसेच त्याची विक्री करण्यासाठी कोणत्याही ब्रँडिंग किंवा मार्केटिंगची देखील गरज नाही. यासाठी फक्त काजूचे झाड लावावे लागते. हे झाड 14 मीटर ते 15 मीटर पर्यंत वाढते. तसेच 3 वर्षात याद्वारे फळे देखील मिळतात. Business Idea
अशा प्रकारे मिळेल फायदा
काजूच्या फळांबरोबरच सालांचा देखील वापर केला जातो. च्या सालाकाजूपासून पेंट आणि लुब्रिकेंट्स तयार केले जातात. त्यामुळे त्याची लागवड फायदेशीर मानली जाते. गेल्या काही वर्षांत शेतीकडे पाहण्याचा शेतकऱ्यांचा दृष्टिकोन आणि विचार बदलला आहे. आता शेतकरी पारंपरिक पिकांऐवजी नगदी पिकांकडे वळत आहेत. यासाठी शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. Business Idea
हवामान कसे पाहिजे
उष्ण तापमानात काजूची वाढ चांगली होते. याच्या लागवडीसाठी 20 ते 35 अंश हे योग्य तापमान असते. तसेच हे कोणत्याही जमिनीवर घेतले जाते. मात्र लाल वालुकामय चिकणमाती त्यासाठी सर्वोत्तम मानली जाते. त्यामुळे अशा प्रकारचे वातावरण या पिकासाठी चांगले असते. Business Idea
कोणत्या राज्यात जास्त शेती केली जाते
भारतातील एकूण लागवडीपैकी काजूचा वाटा 25 टक्के आहे. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये काजूची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. आता उत्तर प्रदेश आणि झारखंडमध्ये देखील त्याची लागवड केली जात आहे. Business Idea
कमाई
काजूचे झाड अनेक वर्षे फळ देत राहते. तज्ज्ञांच्या मते, 500 काजूची झाडे लावण्यासाठी एक हेक्टर जमीनीची आवश्यकता असेल. एका झाडातून सरासरी 20 किलो काजू मिळतात. अशा प्रकारे एक हेक्टरमध्ये 10 टन काजूचे उत्पादन मिळते. त्याच्या प्रक्रियेसाठी खर्च देखील येतो. काजूचा बाजारभाव पाहिला तर 1200 रुपयांच्या आसपास विकला जातो. अशा प्रकारे या लागवडीतून मोठी कमाई करता येईल. Business Idea
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.dccd.gov.in/Content.aspx?mid=30&tid=2
हे पण वाचा :
Post Office च्या ‘या’ विमा पॉलिसीमध्ये 299 रुपयांमध्ये मिळेल 10 लाखांचे विमा संरक्षण !!
Lamborghini Huracan Tecnica : लॅम्बोर्गिनीने लॉन्च केली जबरदस्त कार; ताशी 325 किमी स्पीड
Gold Price Today : सोने-चांदी पुन्हा महागले, आजचा भाव पहा
Bank Holidays : सप्टेंबरमध्ये बँका 13 दिवस राहणार बंद, सुट्ट्यांची लिस्ट पहा !!!
E-Shram : ‘या’ सरकारी योजनेमध्ये कामगारांना दिला जातो 2 लाख रुपयांचा मोफत विमा !!!