हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Business Idea : अनेकांना स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा असतो. मात्र पैशांच्या अडचणींमुळे ते शक्य होत नाही. जर तुम्हालाही स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल आणि त्यासाठी तुमच्याकडे जास्त पैसे नसतील तर तुम्हांला स्नॅक्सचा व्यवसाय सुरू करता येईल. होय, हा एक असा व्यवसाय आहे जो कमी गुंतवणुकीतही सुरु करता येईल. स्नॅक्स आवडत नाहीत अशी व्यक्ती क्वचितच आढळून येईल. सर्व वयाच्या लोकांकडून स्नॅक्स खाल्ले जाते. चला तर मग स्नॅक्सच्या व्यवसायाशी संबंधित काही महत्वाच्या गोष्टींची माहिती घेऊयात…
स्नॅक्सचा व्यवसाय कुठेही सुरू करता येईल. आपल्या देशात खारट (नमकीन) पदार्थ खूप आवडीने खाल्ले जातात. सकाळ असो कि संध्याकाळ चहासोबत बिस्किटे-स्नॅक्स खाणे बहुतेकांना आवडते. बाजारातही अनेक प्रकारचे स्नॅक्स उपलब्ध आहेत, मात्र असे असले तरीही जर तुमच्याकडून लोकांना वेगळी चव मिळाली तर तुम्हांला या व्यवसायात मोठा पल्ला गाठता येईल.Business Idea
अशा प्रकारे सुरूवात करा
स्नॅक्सच्या व्यवसायासाठी फारशी जागाही लागत नाही. हे 300 चौरस फूट ते 500 चौरस फूट जागेतही सुरु करता येईल. मात्र इथे हे लक्षात घ्या कि, हा व्यवसाय सुरु करण्यासाठी फूड लायसन्स, एमएसएमई रजिस्ट्रेशन आणि जीएसटी रजिस्ट्रेशन यांसारखे सरकारी लायसन्सही घ्यावे लागतील. तसेच दुकानासाठी 5 ते 8 किलोवॅट इलेकट्रीसिटी कनेक्शन देखील लागेल. Business Idea
‘या’ वस्तू घ्याव्या लागतील
स्नॅक्स बनवण्यासाठी तुम्हाला मैदा, तेल, बेसन, मीठ, तेल, मसाले, शेंगदाणे तसेच स्नॅक्समध्ये वापरल्या जाणार्या विविध डाळींची देखील आवश्यकता भासेल. तसेच यासाठी तुम्हाला सेव्ह मेकिंग मशीन, फ्रायर मशीन, पॅकेजिंग आणि वजन करण्याचे यंत्रासारख्या काही मशीन्सची देखील गरज भासेल. यासोबतच तुम्हाला मदतीसाठी काही कर्मचाऱ्यांचीही घावे लागतील.
खर्च आणि कमाई
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी किमान 2 ते 6 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. एकदा व्यवसाय सुरू केल्यानंतर लवकरच तुम्हाला एकूण खर्चाच्या 20 ते 30 टक्के नफा मिळू लागेल.Business Idea
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.startupindia.gov.in/content/sih/en/funding.html
हे पण वाचा :
Business Idea: कमी खर्चात ‘या’ व्यवसायाद्वारे मिळवा भरपूर पैसे; कमी खर्चात जास्त नफा
Business Idea : ‘या’ शेतीद्वारे कमी खर्चात मिळवा 5 पट नफा !!! कसे ते जाणून घ्या
Business : कमी खर्चात भरपूर पैसे मिळवून देईल ‘हा’ व्यवसाय, सरकारकडूनही मिळेल मदत
Stock Market : IT शेअर्समध्ये गुंतवणूक करताय… जरा थांबा !!! तज्ञ काय म्हणतात ते पहा