Cabinet Decisions: निर्यातदारांना मदत करण्यासाठी केंद्र देणार 5 वर्षात 4400 कोटी रुपये, 59 लाख लोकांना मिळणार रोजगार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने सरकारी मालकीच्या निर्यात क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन लिमिटेड (ECGC Limited) मध्ये 4,400 कोटी रुपयांच्या भांडवली गुंतवणुकीला मंजुरी दिली आहे.” केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सांगितले की, “ECGC देखील सार्वजनिक ऑफरद्वारे (IPO) लिस्टिंग केली जाईल. 2021-22 पासून 5 वर्षांसाठी सरकार ECGC मध्ये 4,400 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल.”

500 कोटी त्वरित ECGC मध्ये टाकले जातील
केंद्रीय मंत्री गोयल यांनी सांगितले की,”500 कोटी रुपये त्वरित ECGC मध्ये जमा केले जातील. ECGC पुढील वर्षी लिस्टिंग होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.” 21 सप्टेंबर 2021 पर्यंत चालू आर्थिक वर्षात एकूण निर्यात 185 अब्ज रुपये झाली असल्याचेही त्यांनी सांगितले. निर्यातदारांना क्रेडिट इन्शुरन्स सर्व्हिस पुरवून ECGC निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आले होते. व्यावसायिक आणि राजकीय कारणांमुळे परदेशी खरेदीदारांकडून पैसे न भरण्याच्या धोक्यांविरुद्ध निर्यातदारांना क्रेडिट इन्शुरन्स देण्याचा हेतू आहे.

गोयल म्हणाले,” लाखो लोकांना रोजगार मिळेल “
वाणिज्य मंत्री गोयल म्हणाले की,”ECGC मध्ये 4,400 कोटी रुपयांची गुंतवणूक निर्यातदारांना तसेच बँकांना मदत करेल. त्याचबरोबर 59 लाख लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासही मदत होईल. यातील 2.6 लोकांना औपचारिक क्षेत्रात नोकऱ्या मिळतील. ECGC देशातील निर्यात पत विमा बाजारपेठेत आघाडीवर आहे, ज्याचा बाजार हिस्सा सुमारे 85 टक्के आहे. याशिवाय, राष्ट्रीय निर्यात विमा खाते योजना (NEIA) सुरू ठेवण्यास आणि पाच वर्षांत 1,650 कोटी रुपयांच्या अनुदान देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.”