हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात शिंदे – फडणवीस सरकार असल्यामुळे आता या नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ शपथविधीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या सरकारच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीचा तारीख ठरली असून दि. 12 किंवा 13 जुलै रोजी शपथविधी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शिवसेनेचे निष्ठावंत समजले जाणारे एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारले. एकनाथ शिंदे यांनी पक्षात फूट पाडत 40 आमदारांना सोबत घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात असलेले महाविकास आघाडी सरकार पाडले. आता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी भाजप व शिंदे गटाकडून प्रयत्न केले जात असून दोन दिवसात खाते वाटपावर चर्चाही केली जाणार आहे.
कुणाला मिळणार कुठले खाते?
दरम्यान खातेवाटप झाल्यानंतर काही महत्त्वाची खाती शिंदे गटाला मिळतील अशी चर्चा केली जात आहे. तर भाजपकडे गृह, महसूल खाते जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर, शिंदे गटाकडे नगरविकास, सार्वजनिक बांधकाम खाते जाणार असल्याची चर्चा सुरू आहे.