Flipkart विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची CAIT ची मागणी, संपूर्ण प्रकरण काय आहे ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) या व्यापारी संघटनेने ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. फ्लिपकार्टवर भारतीय राज्य नागालँडला भारता बाहेरील भाग असल्याचे म्हंटले आहे. या गंभीर प्रकरणावर कॅट प्रतिनिधीमंडळ गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहे. कॅटचे ​​राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल म्हणाले की, फ्लिपकार्टने नागालँड आणि ईशान्य भारतातील लोकांचा नुसता अपमानच केलेला नाही, तर प्रत्येक भारतीयांनाही दुखविले आहे.

‘फ्लिपकार्टचे विधान हे देशाच्या सार्वभौमत्व-अखंडतेसाठी आव्हान आहे’
खंडेलवाल म्हणाले की, फ्लिपकार्टच्या या गुन्हेगारी विधानाचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. जर या ई-कॉमर्स कंपनीविरूद्ध कठोर कारवाई केली गेली नाही तर येणाऱ्या काळात ही कंपनी लेह आणि लडाखलाही भारताचा भाग नसल्याचे म्हणू शकेल. खंडेलवाल म्हणाले की, फ्लिपकार्टच्या या विधानामुळे भारताच्या सार्वभौमत्वाला (Sovereignty) थेट आव्हान दिले गेले आहे, जे खपवून घेतले जाणार नाही.

हे विधान ‘भारतविरोधी शक्तींसारखे आहे, त्यांना क्षमा करता येणार नाही’
फ्लिपकार्टने केलेले हे विधान म्हणजे भारतविरोधी शक्तींसारखे आहे, असा देखील आरोप कॅटने केला आहे. अशा गंभीर गुन्ह्यासाठी कंपनीला कोणत्याही परिस्थितीत क्षमा केली जाऊ शकणार नाही. कर्मचार्‍यांचे असे विधानदेखील त्यांचे वैयक्तिक मत म्हणून घेतले जाऊ शकणार नाही. खरे म्हणजे नागालँडची राजधानी कोहिमा येथील एका व्यक्तीने ई-कॉमर्स कंपन्यांना फेसबुकवर शॉपिंग सेवा देण्यास सांगितले होते, त्यास उत्तर म्हणून फ्लिपकार्टने आपल्या सोशल मीडिया हँडलद्वारे म्हटले आहे की, ते देशाबाहेरील ठिकाणी सेवा पुरवित नाहीत. मात्र, यानंतर लगेचच फ्लिपकार्टने ही कमेंट डिलीट केली होती, परंतु यादरम्यान, बर्‍याच जणांनी त्याचे स्क्रीनशॉट घेतले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.