हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सार्वजनिक क्षेत्रातील Canara Bank च्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. आता कॅनरा बँकेचे रुपे क्रेडिट कार्ड NPCI द्वारे संचालित BHIM, Paytm, PayZapp, Mobikwik, Freecharge इत्यादी UPI Apps वर लाइव्ह झाले आहे. यामुळे आता Canara Bank च्या ग्राहकांना आपले रुपे क्रेडिट कार्ड या Apps च्या UPI शी लिंक करून जवळच्या किराणा दुकानात मर्चंट UPI QR कोड स्कॅन करून पेमेंट करता येईल.
इथे हे लक्षात घ्या कि, UPI सुविधेवर नुकतेच रुपे क्रेडिट कार्ड सुरू करण्यात आले आहे. आता आपल्याला जवळच्या दुकानात स्कॅन करून क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करता येईल. मात्र, याद्वारे फक्त मर्चंट UPI QR कोड स्कॅन करूनच पैसे देता येतील. यामध्ये ग्राहकांना P2P पेमेंट करता येणार नाही. सध्या पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, एचडीएफसी बँक आणि Canara Bank च्या रुपे क्रेडिट कार्डधारकांना आपले कार्ड BHIM, Paytm, PayZapp, Mobikwik, Freecharge सारख्या UPI Apps शी लिंक करता येते आहे.
‘या’ 5 बँकांचे रुपे क्रेडिट कार्ड झाले लाईव्ह
हे जाणून घ्या कि, सध्या फक्त 5 बँकांचेच रुपे क्रेडिट कार्ड हे BHIM, Paytm, Mobikwik, PayZapp, Freecharge यांसारख्या UPI Apps वर लाईव्ह झाले आहे. मात्र भविष्यात इतर बँकांचे RuPay क्रेडिट कार्ड देखील इतर UPI Apps शी देखील लिंक करता येतील. सध्या, फक्त एचडीएफसी बँक, पंजाब नॅशनल बँक, Canara Bank, युनियन बँक ऑफ इंडिया आणि इंडियन बँकेच्या रुपे क्रेडिट कार्डधारकांनाच आपले कार्ड UPI App शी लिंक करता येतील.
अशा प्रकारे आपले रुपे क्रेडिट कार्ड BHIM App शी करा लिंक
सर्वांत आधी BHIM App उघडा.
यानंतर लिंक केलेल्या बँकेच्या खात्यावर क्लिक करा.
आता + वर क्लिक केल्यावर Add Account – मध्ये बँक खाते आणि क्रेडिट कार्ड असे 2 पर्याय दिसतील.
अय क्रेडिट कार्डवर क्लिक केल्यानंतर, संबंधित कार्डवर क्लिक केल्यानंतर, आपल्या मोबाइल नंबरशी लिंक केलेल्या क्रेडिट कार्डचे डिटेल्स दिसतील. (मेनपेजवर दिसणार्या UPI वरील रुपे क्रेडिट कार्डच्या बॅनरवर क्लिक करूनही प्रक्रिया करता येईल)
आता क्रेडिट कार्डचे शेवटचे 6 अंक आणि व्हॅलिडिटी एंटर करा.
यानंतर मोबाईलवर आलेला OTP टाका.
UPI पिन तयार करा. अशा प्रकारे रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण होईल.
आता मर्चंट UPI QR कोड स्कॅन करा आणि रुपे क्रेडिट कार्ड निवडा आणि UPI पिन टाकून पेमेंट पूर्ण करा. Canara Bank
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://canarabank.com/
हे पण वाचा :
New Business Idea : उन्हाळ्याच्या दिवसांत ‘या’ वस्तूची विक्री करून मिळवा भरपूर नफा
BSNL चा ‘हा’ प्लॅन खूपच फायदेशीर, पण रिचार्ज करावा की नाही ते जाणून घ्या
Multibagger Stock : तोट्यात असूनही टाटा ग्रुपच्या ‘या’ कंपनीच्या शेअर्सने पकडला वेग
लवकरच मुंबई-गोवा मार्गावरही धावणार Vande Bharat Train, केंद्रीय मंत्र्यांनी दिली माहिती
Yes Bank चे गुंतवणूकदार गोंधळात, 3 वर्षांनंतर पुन्हा पाहावे लागणार तेच दिवस ???