खारघर : हॅलो महाराष्ट्र – गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. सध्या राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार आहे. नवी मुंबईतील खारघर शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये खारघर पोलीस ठाण्यात शिंदे गटाचे नेते रुपेश पाटील (rupesh patil) यांच्यावर मारहाण आणि धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिंदे गटाचे रुपेश पाटील यांच्यावर मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल pic.twitter.com/t74p5oj8do
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) September 19, 2022
काय घडले नेमके?
रुपेश पाटील (rupesh patil) यांच्यावर आपल्याच इमारतीमधील एका व्यावसायिकाला मारहाण केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शॉप बाहेर लावलेले वाहन काढण्यास नकार दिला म्हणून हि मारहाण करण्यात आली. हि संपूर्ण घटना पीडित व्यावसायिकाच्या कार्यालयातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
या मारहाणीप्रकरणी रुपेश पाटील (rupesh patil) यांच्याविरोधात कलम 452, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच रुपेश पाटील यांनीदेखील व्यवसायिक मनीष तिरपिट यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी नेमके काय घडले याचा पुढील तपास खारघर पोलीस करत आहेत.
हे पण वाचा :
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!
येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर
सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक
2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!
संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?