धक्कादायक ! लग्नाचे आमिष दाखवून नर्सवर बलात्कार,डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत एका नर्सने मुंबईतील बांद्रा पोलीस ठाण्यात डॉक्टरविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. हा डॉक्टर हिंदुजा हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे. त्याने लग्नाचे आमिष दाखवत या नर्सवर बलात्कार केला आहे. या आरोपी डॉक्टरचे नाव निखिल जॉन असे आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येत आहे.

काय आहे प्रकरण
या पीडित महिलेची आणि डॉक्टरची 2014मध्ये छत्तीसगडमध्ये ओळख झाली होती. या ओळखीचे मैत्रीत आणि पुढे प्रेमात रूपांतर झाले. यानंतर आरोपीने या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारिरीक संबंध ठेवले. यानंतर तरुणीने या डॉक्टरकडे लग्नाचा विषय काढला असता डॉक्टरने लग्नास नकार दिला. यानंतर या पीडितेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांकडून डॉक्टरचा शोध घेण्यात येत आहे.

या पीडितेने शुक्रवारी संध्याकाळी निखिल जॉन विरोधात तक्रार दाखल केली आहे. या नर्सने डॉक्टरविरोधात आयपीसी कलम 376 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून याप्रकरणाचा पुढील तपास करण्यात येत आहे. या प्रकरणात अजून डॉक्टरला अटक करण्यात आली नाही. अशी माहिती बांद्रा पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे.

Leave a Comment