कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
लोकप्रतिनिधी, विविध संस्था आणि प्रतिष्ठित व्यक्ती पत्र देवून बाहेरुन जिल्ह्यामध्ये लोकांना पाठवित आहे. यामुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचे आणि जिल्हा बंदीचे उल्लंघन होत आहे, अशा लोकप्रतिनिधी, संस्था तसेच संबंधित व्यक्ती यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. यामध्ये पत्रासह संबंधिताचे वाहनही जप्त होणार आहे.
कोरोना प्रतिबंधक उपाय योजनेसाठी जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदी मध्ये जिल्हा बंदीही लागू करण्यात आली आहे, असे सांगून जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, मागील काही दिवसांपासून असे निदर्शनास आले आहे, जिल्ह्याबाहेरील काही प्रतिष्ठित व्यक्ती, संस्था, काही जबाबदार लोकप्रतिनिधी जिल्हाबाहेरील काही व्यक्तींना पत्र देत आहेत. अशा व्यक्ती निरनिराळ्या तपासणी नाक्यांवर पत्र दाखवून जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत येत आहेत आणि जिल्ह्यामध्ये प्रवेश देण्यासाठी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करीत आहेत.कुठल्याही संस्था, लोकप्रतिनिधी यांनी अशी बेकायदेशीर पत्रे देवून संचारबंदीचे उल्लंघन करु नये असे जिल्हाधिकारी देसाई म्हणाले.
त्याचबरोबर अशा व्यक्ती जिल्ह्यामध्ये अचानक आल्याने जिल्ह्यामध्ये संसर्ग वाढून जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमोडून पडेल. असे प्रकार घडलेले आहेत. या विरुध कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षकांना निर्देश दिले आहेत. संस्था, प्रतिष्ठित व्यक्ती, लोकप्रतिनिधी यांनी अशी पत्र देवून नयेत. अशी पत्रे दिली असल्यास त्वरित मागे घ्यावीत. मागे घेतली नाहीत तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews’
हे पण वाचा –
सोने चांदीच्या भावात झपाट्याने घट सुरुच, जाणुन घ्या आजचा दर
Breaking | पुण्यात कोरोनाचा पहिला बळी
WhatsApp ने स्टेटस व्हिडिओ १५ सेकंदाचा का केला? जाणुन घ्या या बदलाचे कोरोना, चीन कनेक्शन
महाराष्ट्रात करोनाबाधितांचा आकडा २१५वर
धक्कादायक! अमेरिकेत १ ते २ लाख लोकांचा मृत्यू होण्याची भीती
जगातील पहिल्या कोरोनाग्रस्ताचा लागला शोध, कोण आहे ‘हा’ व्यक्ती? घ्या जाणून
भारत कोरोना संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात आहे म्हणजे नेमकं काय?
इटलीमध्ये कोरोनाचे एवढे बळी का?
नेटफ्लिक्सवर ‘या’ वेबसिरिजमध्ये करण्यात आली होती कोरोना व्हायरसची भविष्यवाणी! घ्या जाणुन