हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयने क्लीनचीट दिल्याची चर्चा सर्वत्र सुरु झाल्याने याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट केले होते. मात्र, आज सीबीआयने खुलासा केला असून अनिल देशमुखांप्रकरणी तपास अद्यापही सुरुच असून पुराव्यांनुसारच देशमुखांवर गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती सीबीआयने दिली आहे.
याबाबत केंद्रीय अन्वेषण विभागाने दिलेली माहिती अशी की, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सध्या कोणतीही क्लिनचीट देण्यात आलेली नाही. अद्याप याप्रकरणी देशमुख यांची सीबीआयकडून चौकशी पूर्ण करण्यात आलेली नसून त्यांच्यावरील चौकशी सुरुच आहे. वास्तविक पाहता अनिल देशमुख यांच्यावर पूर्ण पुराव्याच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे देशमुखाना क्लीनचिट देण्यात आलेली नाही.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना क्लीनचिट मिळाली नसल्याची माहिती सीबीआयने दिली असून त्यांना आतापर्यंत ईडीच्यावतीने 5 समन्स बजावन्यात आलेले आहेत. आता सीबीआय कडूनच माहिती देण्यात आली असल्याने अनिल देशमुकांच्या क्लीनचिटच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे हे नक्की !