हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सध्या राज्य सरकारला केंद्र सरकारकडून कमी प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. तो अधिकाधिक करावा अशी मागणी राज्य सरकारकडून केली जात आहे. सध्या जेवढ्या क्षमतेने ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. त्यापेक्षा आधी गरज भासत आहे. वाढणारी रुग्ण संख्या लक्षात घेता केंद्र सरकाने राज्य सरकारला अधिक रेमडीसीवरचा पुरवठा करावा, अशी मागणी केली असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नाशिक येथे काल घडलेल्या दुर्घटनेनंतर राज्य सरकारकडून मृत्यू पावलेल्यांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच दुर्घटनेची उच्चस्थरीय कमिटीमार्फत पूर्ण चौकशी केली जाणार असल्याचे डॉ. टोपे यांनी सांगितले. आज गुरुवारी डॉ. टोपे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, राज्याला रोज ५० हजार रेमडेसीव्हीरची गरज भासत आहे. केंद्राच्या निर्णयामुळे राज्यासमोर अडचण येत आहेत. केंद्राने दहा दिवसांसाठी फक्त २६ हजार रेमडीसीवरचा पुरवठा केला आहे. त्यामुळे दररोज १० हजार रेमडजेसीव्हीरची कमतरता भासणार आहे. ती दूर करण्यासाठी केंद्र सरकारने जास्तीत जास्त रेमडीसीव्हरचा पुरवठा करावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुठल्याही परिस्थितीत रेमडीसीव्हरच्या पुरवठ्याचा प्रश्न सोडवावा.
We need 50,000 Remdisivir injections daily but now we have been allotted only 26,000 injections for the next 10 days by the Centre. I appeal to the Government of India to allot more injections to the State, I will write to them today: Maharashtra Health Minister Rajesh Tope pic.twitter.com/f1EqihYRD8
— ANI (@ANI) April 22, 2021
सध्याच्या काळात रेमडेसीव्हीरबाबत तोडगा काढणे गरजेचं आहे. रेमडेसीव्हीर सात कंपन्या बनवत आहेत. आदर पुनावाला यांच्याशीही चर्चा केली. तेव्हा त्यांनी सांगितलं त्यांचं पूर्ण प्रोडक्शन येत्या २४ मेपर्यंत केंद्राने बुक केलेले आहे. त्यामुळे महाराष्ट्राला सिरम इन्स्टिट्यूटकडून थेट लसी घेण्यासाठी आणखी महिनाभर वाट पाहावी लागणार आहे. किमान एक महिना तरी राज्य सरकारला सध्या ते विकत घेऊ शकता येत नाही. अठरा ते ४५ या वयासाठी रेमडीसीवरची खरेदी करण्यात येणार नाही. सध्या रेमडीसीवरचा तुटवडा भासत आहे, हे खरं आहे. राज्य सरकारला केंद्राकडून कमी प्रमाणात रेमडीसीवर देण्यात आलेले आहे, अशी माहिती डॉ. टोपे यांनी दिली.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.