हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदा अनेक सेवा सुविधांमध्ये महत्वाचे बदल केले आहे. यासोबतच आता केंद्र सरकारने आधार कार्ड पडताळणीसाठी नवीन नियम लागू केले आहेत. या नवीन नियमामुळे लोकांना वेगवेगळ्या सेवा सुविधांचा लाभ सहज घेता येणार आहे. या नवीन प्रणालीमुळे, नागरिकांना कुठेही, कधीही फेस ऑथेंटिकेशन सेवा उपलब्ध होईल, आणि त्यामुळे सार्वजनिक व खासगी सेवा अधिक त्वरित व कार्यक्षम होणार आहेत.
नवे पोर्टल देखील सुरू –
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने आधार आधारित फेस ऑथेंटिकेशनचा वापर करण्यासाठी खासगी कंपन्यांना मंजुरी दिली आहे. यामुळे, विविध सरकारी आणि खासगी क्षेत्रातील सेवा आता अधिक सोप्या व जलद पद्धतीने उपलब्ध होणार आहेत. यासाठी मंत्रालयाने swik.meity.gov.in नावाचे एक नवे पोर्टल देखील सुरू केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून, सरकारी आणि अशासकीय संस्थांना आधार पडताळणीसाठी अर्ज करण्याची सुविधा मिळेल. मंजुरी मिळाल्यावर, संबंधित संस्थांना आधार पडताळणीची प्रक्रिया सुरू करता येईल.
आधार ऑथेंटिकेशन सेवा उपलब्ध –
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार, आधार कार्ड ऐच्छिक असले तरी, काही सरकारी योजनांसाठी त्याचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. यामध्ये नागरिकांना विविध प्रकारच्या सरकारी आणि खासगी सेवांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य होईल. या प्रणालीमध्ये यूआयडीएआयने फेस ऑथेंटिकेशन आणि ओटीपी यंत्रणा सुरू केली आहे, ज्यामुळे आधार पडताळणीची प्रक्रिया अधिक सुलभ होईल. यामध्ये, सरकारी विभागांनंतर आता खासगी कंपन्यांना देखील आधार ऑथेंटिकेशन सेवा उपलब्ध होणार आहे.
आधार पडताळणीच्या सोप्या सुविधांचा वापर –
31 जानेवारी 2025 नंतर, हॉस्पिटलिटी, आरोग्य, ई-कॉमर्स, शिक्षण, क्रेडिट रेटिंग अशा विविध क्षेत्रांमध्ये आधार पडताळणीच्या सोप्या सुविधांचा वापर केला जाईल. यामुळे, नागरिकांना ई-केवायसी, परीक्षा नोंदणी, कर्मचाऱ्यांची हजेरी आणि इतर सेवांसाठी वारंवार कागदपत्रांची आवश्यकता भासणार नाही. यासोबतच आधार कार्ड सोबतच वर्च्युअल आयडीही जारी केल्यामुळे आधार नंबर शेअर न करता देखील पडताळणी करता येणार आहे. हि नवीन प्रणाली खूप फायदेशीर ठरणार आहे.