नवी दिल्ली । केंद्र सरकारने कोरोना मेडिसिन (Corona Medicines), लस आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सच्या घरगुती पुरवठा (Domestic Supply) आणि व्यावसायिक आयातीत मालावरील (Commercial Import) वस्तू आणि सेवा कर (GST) काढण्यास नकार दिला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की,” जीएसटी काढून टाकल्यास सामान्य ग्राहकांसाठी या सर्व वस्तू महागड्या होतील.” त्या म्हणाल्या की,” GST काढून टाकल्यानंतर त्यांचे उत्पादक उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालावरील करासाठी इनपुट-टॅक्स-क्रेडिट (ITC) क्लेम करू शकणार नाहीत.”
‘GST काढून टाकल्यास कंपन्या सामान्य ग्राहकांकडून संपूर्ण किंमत वसूल करतील’
देशातील लस आणि व्यावसायिक आयात देशांतर्गत पुरवठा सध्या 5% GST आकर्षित करतो. त्याचबरोबर, कोविड -19 च्या उपचारात वापरली जाणारी औषधे आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सवर 12% GST लागू आहे. या वस्तूंवरील GST पासून सूट मिळावी या मागणीसाठी अर्थमंत्री सीतारमण यांनी केलेल्या ट्विटमध्ये असे उत्तर दिले की, लसीवर संपूर्ण 5% सूट दिली गेली तर कच्च्या मालावरील कर कपातीचा फायदा लस उत्पादकांना मिळणार नाही. या प्रकरणात, ते ग्राहकांकडून संपूर्ण किंमत वसूल करतील. GST लागू झाल्यामुळे उत्पादकांना ITC चा फायदा होतो. ITC अधिक असल्यास ते रीफंड क्लेम करु शकतात. त्यामुळे GST मधून सूट मिळाल्यास ग्राहकांचे नुकसान होईल.
100 रुपयांच्या IGST मधून राज्यांना 70.50 रुपये मिळतात
अर्थमंत्री सीतारमण म्हणाल्या की,” जर एकीकृत जीएसटी (IGST) म्हणून काही वस्तूंवर 100 रुपये मिळाले तर त्यातली निम्मी रक्कम केंद्रीय जीएसटी (CGST) आणि राज्य जीएसटी (SGST) या दोहोंच्या खात्यात जाते. याशिवाय केंद्रीय जीएसटी म्हणून केंद्राला मिळालेल्या रकमेपैकी 41 टक्के रक्कमही राज्यांना दिली जाते. अशा प्रकारे, प्रत्येक 100 रुपयांपैकी एकूण 70.50 रुपये हा राज्यांचा वाटा आहे.” त्या म्हणाल्या की,” GST लस 5 टक्के दराने बनविणे कंपन्या आणि सर्वसामान्यांच्या हिताचे आहे.” पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काही दिवसांपूर्वीच याबाबत एक पत्र लिहिले आहे. कोरोनाच्या उपचारात वापरल्या जाणार्या अनेक वस्तूंवर केंद्र सरकारने IGST आणि कस्टम ड्युटी मध्ये आधीच सवलत दिली आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group