हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात आणि प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात धुव्वाधार पाऊस पडत असून महापुराचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करुन राज्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला. केंद्र सरकार महाराष्ट्राला सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे.
याबाबत मोदींनी ट्विट करत माहिती दिली, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधून महाराष्ट्रातल्या काही भागातला पूर आणि मुसळधार पाऊस याबाबत चर्चा केली. या परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले. प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी आणि सुखरूपतेसाठी प्रार्थना करीत आहे. असे मोदी म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधून महाराष्ट्रातल्या काही भागातला पूर आणि मुसळधार पाऊस याबाबत चर्चा केली. या परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले. प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी आणि सुखरूपतेसाठी प्रार्थना करीत आहे @OfficeofUT
— Narendra Modi (@narendramodi) July 22, 2021
दरम्यान, राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात अतिवृष्टी आली असून अनेक घरे पाण्याखाली गेली आहेत. लोकांचं स्थलांतर करण्याचं काम चालू आहे. कोल्हापूरात पंचगंगा नदीचे पाणी शहरात शिरायला लागले असून सांगलीत कृष्णा नदीच्या पातळीत वाढ झाली असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.