केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय : या सहा राज्यातील लहान मुलांचे केले जाणार लसीकरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशात ओमिक्रोनचे रुग्ण सापडल्यानंतर आता राज्यात ओमिक्रॉनचा प्रसार अत्यंत वेगाने होत आहे. मुंबईत रुग्ण सापडल्यानंतर काल पुणे आणि पिपंरी-चिंचवडमध्ये ओमिक्रॉनचे नवे 7 रुग्ण आढळून आले आहेत. देशात झपाट्याने वाढत जाणाऱ्या या ओमिक्रोनमुळे खबरदारी म्हणून केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. “तो म्हणजे देशातील सहा राज्य असलेल्या महाराष्ट्र, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पंजाब, झारखंड, बिहार या राज्यातील लहान मुलांचे लसीकरण केले जाणार आहे. याबाबत नॅशनल टेक्निकल ऍडव्हायझरी ग्रुप ऑफ इम्युनायझेशनच्या आज सकाळी 11 वाजता होणाऱ्या या बैठकीमध्ये बूस्टर डोस आणि लहान मुलांना लसकरणाबाबत निर्णय घेतला जाणार आहे

देशात ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या रुपाचा संसर्ग वाढत असताना केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकार देशात अठरा वर्षाखालील मुलांच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची परवानगी देण्याची शक्यता आहे. आज लसीकरणाविषयक राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समितीची बैठक होणार आहे. सध्या केंद्र सरकर विशेषत्वाने 12 ते 17 वर्षे या वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याची परवानगी देण्याविषयी सरकार विचार करत आहे.

सध्या देशात ओमिक्रॉनचा धोका वाढला असून पाच राज्यात ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर वय वर्षे 12 ते 17 या वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. या निर्णयावर शिक्कामोर्तब झालेच तर सुरुवातीला 6 राज्यातील मुलांचे लसीकरण प्राधान्याने केले जाणार आहे. यामध्ये तमिळनाडू, उत्तर प्रदेश तसेच महाराष्ट्रात सुरुवातीला लसीकरण केले जाणार आहे. लहान मुलांना ओमिक्रॉन या विषाणूचा विशेष धोका असल्याचे तज्ज्ञांकडून म्हटले जात आहे.

Leave a Comment