संभाजीनगर राड्यामागे मास्टरमाईंड फडणवीस, MIM- भाजपमध्ये मिलीभगत

chandrakant khaire on bjp mim
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती संभाजीनगर येथील किराडपुरा परिसरात 2 गटात मोठा राडा झाला. यावेळी प्रचंड दगडफेक आणि गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. या राड्यांनंतर ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी भाजप- शिंदेगटासह एमआयएमला जबाबदार धरले आहे. या राड्यामागचे मास्टरमाईंड देवेंद्र फडणवीस असून MIM- भाजपमध्ये मिलीभगत आहे असा सनसनाटी आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले, महाराष्ट्रात अराजकता निर्माण करून अशांतता निर्माण करण्याचं काम मिंधे सरकार करत आहे. गृहमंत्र्यांचे लक्ष्य नाही. देवेंद्र फडणवीस, राज्यमंत्री भागवत कराड आणि इम्तियाज जलील हे सगळे दोस्त आहेत. एमआयएम ही भाजपची बी टीम आहे. आगामी महानगर पालिका, विधानसभा- लोकसभा, जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूकासाठी हा गेम केला जात आहे. अशा प्रकारचं राजकारण करून हे महाराष्ट्राच्या जनतेला वेठीस धरत आहेत असा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला.

ते पुढे म्हणाले, इम्तियाज जलील संभाजीनगरमध्ये निवडून आल्यापासून संभाजीनगर मध्ये गोंधळ सुरु झाला आहे. जलील यांना मिंधे गट आणि फडणवीस मदत करतात. एमआयएम, भाजप आणि शिंदे गट हे सगळे आतून मिळालेले आहेत. हे सगळं मिलीभगत आहे. २ तारखेला महाविकास आघाडीच्या मेळाव्यात विघ्न यावं यासाठी सरकारचा प्रयत्न सुरु आहे असेही चंद्रकांत खैरे यांनी म्हंटल.