हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांसाठी काल खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी उपोषण केले. सरकारच्या लेखी आश्वासनानंतर त्यांनी उपोषण सोडले. यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “मराठा आरक्षणासाठी छत्रपतींना आपले प्राण पणाला लावावे लागले ही महाराष्ट्रासाठी शरमेची बाब आहे,” अशी टीका पाटील यांनी केली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत ठाकरे सरकावर निशाणा साधला आहार. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “छत्रपती संभाजी राजे यांनी मराठा समाजासाठी सुरू केलेले उपोषण मागे घेतल्यामुळे त्यांचे प्राण वाचले आहेत. छत्रपतींना आपले प्राण पणाला लावावे लागले ही महाराष्ट्रासाठी शरमेची बाब आहे. आता मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण केल्यानंतर मविआ सरकार समाजाची फसवणूक करणार नाही, अशी आशा आहे.”
छत्रपती संभाजी राजे यांनी मराठा समाजासाठी सुरू केलेले उपोषण मागे घेतल्यामुळे त्यांचे प्राण वाचले आहेत. छत्रपतींना आपले प्राण पणाला लावावे लागले ही महाराष्ट्रासाठी शरमेची बाब आहे. आता मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण केल्यानंतर मविआ सरकार समाजाची फसवणूक करणार नाही, अशी आशा आहे. pic.twitter.com/GzzOQ80Q5p
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) March 1, 2022
“भाजपाचा या उपोषणाला पूर्ण पाठिंबा होता. महाविकास आघाडी सरकारने हे उपोषण टाळण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही किंवा त्याची ताबडतोब दखलही घेतली नाही. अखेरीस छत्रपतींचे प्राण पणाला लागल्यावर या सरकारला जाग आली आणि त्यांनी काही मागण्या मान्य केल्या. तथापि, बारकाईने विचार केला तर जे काम या सरकारने करायलाच हवे होते आणि जे त्यांना सहजपणे करता आले असते. त्यासाठी छत्रपती संभाजीराजे यांना प्राण पणाला लावावे लागले, असे दिसते.