हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल सातारा जिल्ह्यातील फलटण येथील कार्यकर्त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार व शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. संजय राऊत हे एक नंबरचे डबल ढोलकी आहेत. आणि शरद पवार याच्या बाबत सांगायचे झाले तर ते नेहमीच पंतप्रधान होत असतात, अशी टीका पाटील यांनी केली.
फलटण येथील भाजपच्या कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर टीका करताना म्हणाले कि, भाजपाच्या जीवावर अठरा खासदार निवडून आणा-यांनी देशाच्या राजकारणात जायची स्वप्न पाहू नयेत. आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे. मात्र, शरद पवार तर नेहमीच पंतप्रधान होत असतात.
ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्यावरून पाटील यांनी ठाकरे सर्कावर टीका केली. राज्यात हे काय चाललय, गोंधळी सरकार आहे का? फक्त ओबीसी जागा वगळून निवडणुका म्हणजे कपाळाला हात मारून घायचा का? निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय गोंधळात गोंधळ निर्माण करणारा आहे. एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मा लावण्याचा विचार कॅबिनेट मध्ये झाला. हे हुकूमशाही सरकार आहे, असा आरोपही यावेळी पाटील यांनी केला.




