जगभरातील फक्त 1% वाहने भारतात, मात्र रस्ते अपघातात अव्वल, पूर्ण रिपोर्ट वाचा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । जगातील वाहनांपैकी एक टक्का वाहने भारतात आहेत, परंतु जगभरात रस्ते अपघातांमध्ये मृत्यू पडणाऱ्या लोकांपैकी 11 टक्के प्रमाण भारतात आहे. वर्ल्डबँकच्या (Worldbank) अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. भारतात दरवर्षी सुमारे साडेचार लाख रस्ते अपघात होतात आणि त्यामध्ये दीड लाख लोकांचा मृत्यू होतो.

अहवालात असे म्हटले आहे की, रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू भारतामध्ये झाला आहे. जगातील वाहनांपैकी केवळ एक टक्‍के वाहन भारताकडे आहे, परंतु रस्ते अपघातात जगभरात होणाऱ्या मृत्यूंपैकी 11 टक्के भारताचा वाटा आहे. देशात दर तासाला 53 रस्ते अपघात होत आहेत आणि दर चार मिनिटांत एक मृत्यू होतो. वर्ल्डबँकच्या अहवालानुसार गेल्या दशकात भारतीय रस्त्यावर 13 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे आणि याशिवाय 50 लाख लोक जखमी झाले आहेत.

या अहवालात असे म्हटले गेले आहे की,”भारतात रस्ते अपघातांमुळे 5.96 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, जे सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (GDP) 3.14 टक्के इतके आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नुकत्याच केलेल्या अभ्यासानुसार असा अंदाज आहे की, “भारतातील रस्ते अपघातांमुळे सामाजिक व आर्थिक नुकसान 1,47,114 कोटी होते, जे जीडीपीच्या 0.77 टक्के इतके आहे.”

मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, रस्ते अपघातात होणाऱ्या 76.2 टक्के लोकांचे वय 18 ते 45 वर्षे वयोगटातील आहे. म्हणजेच हे लोक कार्यशील वयोगटातील आहेत. जागतिक पातळीवर, रस्ते अपघात हे मृत्यूचे आठवे सर्वात मोठे कारण आहेत. जागतिक बँकेच्या अहवालानुसार, कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये रस्ते अपघातांचे प्रमाण उच्च-उत्पन्न असलेल्या देशांपेक्षा तीन पट जास्त आहे. अहवालानुसार, भारताकडून प्राप्त केलेली आकडेवारी या निष्कर्षाला अधिक सामर्थ्य देते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment