हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या सहाव्या जागेसंदर्भात महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आज भाजप नेत्यांची भेट घेतली. “राज्यसभेचे निवडणूक बिनविरोध करा, त्याबदल्यात विधान परिषदेची पाचवी जागा सोडणार असल्याचा प्रस्ताव यावेळी भाजप नेत्यांना देण्यात आला. त्यानंतर भाजपचीही एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘मविआ’च्या प्रस्तावावर एक नवा प्रस्ताव दिला. “आमच्यासाठी व पक्षासाठी राज्यसभा महत्वाची आहे. त्यामुळे आम्ही निवडणूक लढणार आहोत. शिवसेनेनेच आपला राज्यसभेचा उमेदवार मागे घ्यावा, मग आम्ही विधान परिषदेला त्यांना मदत करू, असे पाटील यांनी म्हंटले.
देवेंद्र फडणीस यांच्या मुंबईतील सागर निवासस्थानी महाविकास आघाडी सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. या भेटीनंतर भाजप नेत्यांचीही महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीस केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह महत्वाचे नेते होते. या बैठकीनंतर चंद्रकांतदादांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आज महा विकास आघाडीतील शिष्टमंडळाने आमची भेट घेतली.
यावेळी आमच्यात व त्यांच्यात अनेक विषयावर दिलखुलासपणे चर्चा झाली. महाराष्ट्रात परंपरा आहे कि निवडणुका बिनविरोध करायची. मात्र, भाजपलाही राज्यसभेची जागा महत्वाची आहे. काहीही झाले तरी भाजप हि निवडणूक लढणार आहे. त्यामुळे आता शिवसेनेने आपला उमेदवार मागे घ्यावा. त्यांनी तो घेतल्यास आम्हीही विधान परिषदेत त्यानं मदत करू, असे पाटील यांनी म्हणत भाजपची भूमिका स्पष्ट केली.
राज्यसभा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज माघारीची मुदत आहे. मात्र, आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चचंद्रकांत पाटील यांनी भाजपची राज्यसभेबाबतची भूमिका स्पष्ट केली असल्यामुळे महा विकास आघाडी काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.