हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आगामी महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने भाजपकडून जोरदार तयारी केली जात आहे. अनेक ठिकाणी जाऊन भाजप नेत्यांकडून महत्वाचं विधाने केली जात आहेत. दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक विधान केले. “मी पुणे महानगरपालिकेसाठी मतांची भीक मागायला आलोय आणि तुमची मतं बुक करायला आलेलो आहे. ताकाला जाऊन मला भांड लपवायची सवय नाही,” असे पाटील यांनी म्हंटले आहे.
भाजपच्या वतीने पुणे येथे आगामी महानगर पालिका निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चेबांधणी केली जात आहे. यासाठी ठिकठिकाणी सभाही घेतल्या जात आहेत. पुण्यात एका सभेत पाटील म्हणाले की, पुणे महापालिकेत नव्याने 34 गावे समाविष्ट झाल्यामुळे पुणे महानगरपालिकेचे लोकसंख्या तब्बल 70 लाखांवर गेली आहे. असे असताना प्रगती कशी होणार? त्यासाठी पुण्यामध्ये दोन महानगर पालिका व्हायला पाहिजे.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, महानगरपालिकेत गावे समाविष्ट करण्याला माझा विरोधच आहे. याने गावाच गावपण नष्ट होत. मात्र अजित पवारांना वाटत म्हणून ते निर्णय घेतात अशी टीका देखील पाटील यांनी अजित पवारांवर केली आहे.