हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अभिनेता सुशांतसिंग राजपूत आणि मॅनेजर दिशा सालियान यांच्या मृत्यू प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरूच आहे. आज भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्वीट करत दिशा सालियान आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यात कनेक्शन असल्याचा दावा करत खळबळ उडवून दिली. त्यांच्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही सूचक असे विधान केले आहे. “दिशा सालियन प्रकरणात 7 मार्चला सर्व पुरावे समोर येतील, असे पाटील यांनी म्हंटले आहे.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, दिशा सालियन प्रकरणात कोणाचा सहभाग आहे, कोणाकोणाला तुरुंगात जावं लागेल ७ मार्चला कळेल. या प्रकरणातील सर्व पुरावे समोर येतील. या प्रकरणात काही राजकारण नाही
दरम्यान, 7 मार्चनंतर या प्रकरणाचा दूध का दूध और पाणी का पाणी हो जायेगा. घाबरू नका, 7 मार्चला सर्व पुरावे समोर येतील. उसणं अवसान आणणं आणि शिवराळ भाषेचा वापर यामुळेच सुरू आहे. दिवा विझण्याआधी फडफडतो. आपल्याला वाटतं दिवा खूप प्रज्वलित झाला. ती विझण्यापूर्वीची फडफड असल्याचेही पाटील यांनी यावेळी म्हंटले.




