हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना भविष्यात भाजपसोबत युती होणार नाही. आम्ही आमच्या निर्णयावरून मागे जाणार नाही, असे विधान केले होते. त्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे. “संजय राऊतांनी कधीही निवडणूक लढवली नाही. त्यामुळे राऊत काय म्हणाले याला महत्त्व नाही. ते जे म्हणाले त्याचे परिणाम त्यांना निवडणुकीत दिसेल,” असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, भाजप आणि शिवसेना यांच्यात युती होणार आहे संजय राऊत यांनी आज सांगितले आहे. मात्र, खरी गोष्ट हि आहे कि आम्ही युतीबाबत शिवसेनेला प्रस्ताव दिलेला नाही. आता राऊत काहीही बोलत आहेत. त्यांच्या बोलण्याला काहीही महत्व देण्याची आवश्यकता नाही. ते जे आज काही बोलत आहेत. त्याचे परिणाम हे निवडणुकीत दिसतीलच, असेही यावेळी पाटील म्हणाले.
यावेळी पाटील यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की, गेल्या तीन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. तो अजूनही मिटलेला नाही. तो जर आता मिटला नाही तर एक लाख कुटुंब उद्ध्वस्त होतील. विलीनिकरण म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा असतात. चांगल्या पगारवाढीचा प्रस्ताव कर्मचाऱ्यांकडे नेला तर कर्मचारी नक्की एक पाऊल मागे जातील,” असे पाटील यांनी सांगितले.