हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या जी 20 परिषदेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे गैरहजर होते. यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे व अजित पवारांवर टीका केली. “देशाच्या हितासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या जी 20 ची बैठक सोडून उद्धव ठाकरे आणि अजित दादा हे राजकीय बैठका घेत होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले उद्धवजी तुमचं बाळ कुठं गेलं? तुम्ही का उपस्थित राहिले नाहीत परिषदेला? असा सवाल बावनकुळेंनी केला.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, जी 20 ही जगातील प्रगत आणि विकसनशील देशांची संघटना आहे. 2023 मधील या संघटनेच्या परिषदेचं यजमानपद भारताकडे आहे. या पार्श्वभूमीवर पुढील वर्षभरात अनेक बैठका होणार आहेत. बैठकांच्या आयोजनासंबंधीची एक बैठक नवी दिल्लीत काल पार पडली.आज जी 20 बाबत बैठक होती ती देशासाठी भूषणावह आहे. बैठकीला देशातील अनेक मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री आणि अनेक पक्षांचे अध्यक्ष उपस्थित होते. हा देशवासियांचा कार्यक्रम आहे.
महाराष्ट्रात 14 समिट बैठका होणार आहेत. यामुळे महाराष्ट्र राज्याचे ब्रँडिंग होणार आहे. मी बैठकीला उपस्थित होतो त्या बैठकीत सादरीकरण करण्यात आले. निमंत्रण सगळ्यांनाच गेलं होतं. देशप्रेम विकासाच्या बाबतीत अनेक गोष्टी यामध्ये आहेत. बैठकीत अनुउपस्थित राहून त्यांना काय दाखवायचं होतं? हेच देशप्रेम आहे का ? हेच राज्याचे प्रेम आहे का ? असा सवाल बावनकुळे यांनी केला.