हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात काल राज्याचे विरोधीपक्षनेते अजितदादा पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर हल्लाबोल केला. “मनात आणलं ना तर मी करेक्ट कार्यक्रम करेन,” असा इशाराच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर पवार यांनी दिला. दरम्यान आज बावनकुळे यांनी पुन्हा अजित पवार यांच्यावर पलटवार केला आहे. “अजित पवारांनी विरोधीपक्षनेतेपद आपल्याकडे ठेवलं. ते जयंत पाटलांना द्यायला हवं होतं. येत्या 2024 निवडणुकीत अजित पवारांचा करेक्ट कार्यक्रम होईल,” असे मोठे विधान बावनकुळे यांनी केले आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ओबीसी आरक्षणाची फाईल अजितदादांनी फेकून दिली होती. त्याचबरोबर माझा करेक्ट कार्यक्रम करण्याची त्यांच्यात हिंमत नाही. अजितदादा कधी रडतात तर कधी 8-8 दिवस फोन बंद करून पळून जातात.
नागपूर विधानभवन येथे माध्यमांशी संवाद https://t.co/vd5N2m9fW8
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) December 28, 2022
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
हिवाळी अधिवेशनात काल राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा चांगलाच समाचार घेतला होता. ‘सप्टेंबर महिन्यात भाजपचं सरकार आल्यानंतर भाजपचे एक नेते बारामतीत आले. त्यांनी सांगितलं, बारामतीत घड्याळ बंद करण्याचा करेक्ट कार्यक्रम करणार, अशा प्रकारच्या वल्गना करतात. आता आमचं तिथे काम आहे. खरंच करेक्ट कार्यक्रम होणार आहे का? मी जर मनावर घेतलं तर त्यांचाच करेक्ट कार्यक्रम होईल’, असे अजित पवार यांनी म्हंटले.
[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]