UAN नंबरशिवाय अशा प्रकारे तपासा PF Account मधील बॅलन्सची माहिती

PF Account 
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PF Account : आता EPF खातेधारकांना त्यांच्या PF खात्यातील बॅलन्सची माहिती अवघ्या काही सेकंदात मिळू शकेल. यासाठी इंटरनेटची गरजही भासणार नाही. यासाठी त्यांना फक्त आपल्या रजिस्टर्ड मोबाईलवरून मिस्ड कॉल किंवा एसएमएस पाठवावा लागेल. त्यानंतर त्यांच्या पीएफ खात्यामध्ये किती पैसे आले असतील हे सहजपणे कळू शकेल. आता आपल्या PF खात्यातील बॅलन्सची माहिती ऑफलाइन आणि ऑनलाइन अशा दोन्ही पद्धतीने तपासता येईल.

PF Balance Check: Good News! You can also check PF balance even without  UAN, know the process - Business League

ईपीएफओकडून आपल्या खातेधारकांना वेळोवेळी पीएफ खात्यांमध्ये जमा केलेली रक्कम काही दिवसांच्या अंतराने तपासण्याचे सांगितले जाते. यामुळे कोणत्याही प्रकारची फसवणूक झाल्यास त्याची माहिती खातेदाराला लगेचच मिळते. यासाठी ईपीएफओच्या अधिकृत वेबसाइटला देखील भेट देया येते. PF Account

PF balance can be checked without UAN number — here is how | Mint

अशा प्रकारे इंटरनेटशिवाय तपासा पीएफ खात्यातील बॅलन्स

जर आपला UAN नंबर EPFO ​​मध्ये रजिस्टर्ड असेल तर आपल्या नवीनतम योगदानाची आणि PF बॅलन्सची माहिती मेसेजद्वारे मिळवता येईल. यासाठी EPFOHO UAN ENG असे लिहून 7738299899 वर पाठवावा लागेल. इथे हे लक्षात घ्या कि, यामधील शेवटची तीन अक्षरे ही भाषेसाठी आहेत. जर आपल्याला हिंदीमध्ये माहिती हवी असेल तर EPFOHO UAN HIN असे लिहून पाठवा. EPFO कडून इंग्रजी, पंजाबी, मराठी, हिंदी, कन्नड, तेलगू, तमिळ, मल्याळम आणि बंगाली भाषेमध्येही ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी UAN च्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावरून वर नमूद केल्याप्रमाणे एसएमएस पाठवावा लागेल. PF Account

मिस्ड कॉलद्वारे अशा प्रकारे तपासा आपल्या पीएफ खात्यातील बॅलन्स

आपल्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावरून 011 22901406 वर मिस्ड कॉल द्या. यानंतर, EPFO ​​कडून एक मेसेज येईल ज्यामध्ये PF खात्याची माहिती मिळेल. मात्र यासाठी आपले बँक खाते, पॅन आणि आधार UAN शी लिंक असणे आवश्यक आहे. PF Account

How to Check PF Balance Through SMS, Missed Call, Umang App? Follow  Step-by-step Guide Here

EPFO द्वारे अशा प्रकारे तपासा आपल्या पीएफ खात्यातील बॅलन्स

यासाठी EPFO ​​च्या अधिकृत वेबसाइट जावे लागेल.
इथे Employee Centric Services वर क्लिक करा.
आता View Passbook वर क्लिक करा.
मात्र पासबुक पाहण्यासाठी आपल्याला UAN ने लॉगिन करावे लागेल.

Govt's UMANG app offers more than 1200 services; Here's what you need to  know | Zee Business

UMANG App द्वारे

आता UMANG App उघडा आणि EPFO ​​वर क्लिक करा.
दुसऱ्या पेजवर Employee Centric Service वर क्लिक करा.
ईथे View Passbook वर क्लिक करा.
आता आपला UAN नंबर आणि पासवर्ड (OTP) नंबर टाका.
आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर OTP येईल.
यानंतर आपला PF बॅलन्स तपासू शकाल. PF Account

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.epfindia.gov.in/

हे पण वाचा :
Tax Saving Tips : आपल्या गुंतवणुकीचे अशा प्रकारे नियोजन करून वाचवा टॅक्स
Pre-Approved Loan म्हणजे काय ??? जाणून घ्या ते घेण्याचे फायदे
Multibagger Stock : ‘या’ 5 शेअर्सनी गेल्या 1 वर्षात जोरदार रिटर्न देत गुंतवणूकदारांना केले मालामाल
TATA Group च्या ‘या’ कंपनीने गेल्या 20 वर्षात गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस
घरबसल्या अशा प्रकारे तपासा आपल्या LIC पॉलिसीचे स्टेट्स