नवी दिल्ली । केंद्र शासनाने विविध सरकारी सेवांमध्ये प्रवेश सुलभ करण्यासाठी वर्ष 2017 मध्ये उमंग अॅप (UMANG APP) सुरू केले. उमंग अॅपद्वारे आपण एकाच ठिकाणी 20689 प्रकारच्या सेवा वापरू शकता. या अॅपच्या मदतीने भविष्य निर्वाह निधी (PF), डिजिलॉकर (DigiLocker), एनपीएस (NPS), गॅस सिलेंडर बुकिंग, पॅनकार्ड, यूटिलिटी बिल इत्यादींशी संबंधित सर्व्हिस सहज मिळू शकतील.
उमंग अॅप कसे डाउनलोड करावे ?
अँड्रॉईड फोन युझर्स प्ले स्टोअर आणि आयफोन युझर्स अॅप स्टोअर वरून उमंग अॅप डाउनलोड करू शकतात. युझर 9718397183 वर मिस कॉल करूनही या अॅपची लिंक मिळवू शकतात. या व्यतिरिक्त, https://web.umang.gov.in अॅप डाउनलोड करण्यासाठी रिडायरेक्ट करते.
PF बॅलन्स जाणून घेण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा
अनेक वेळा लोकं कठीण प्रसंगी त्यांच्या भविष्य निर्वाह निधीतून पैसे काढतात. कोरोना कालावधीत अनेक लोकांनी नोकर्या गमावल्या गेल्या तेव्हा बहुतेक लोकांनी त्यांच्या भविष्य निर्वाह निधीतून पैसे काढून घेतल्याचे दिसून आले. परंतु अशीही अंक लोकं आहेत ज्यांना त्यांच्या PF खात्याबद्दल कोणतीही विशिष्ट माहिती नाही. आज आम्ही तुम्हाला एक सोपा मार्ग सांगू ज्याच्या मदतीने तुम्हाला PF बॅलन्सची माहिती कळू शकेल.
>> आपल्या फोनवर उमंग अॅप डाउनलोड करा.
>> उमंग अॅप उघडा आणि EPFO आयकॉनवर क्लिक करा.
>> आता employee centric service वर क्लिक करा.
>> कर्मचारी केंद्रित सेवेत जा आणि पासबुकवर क्लिक करा.
>> आता आपला UAN नंबर एंटर करा आणि Get OTP वर क्लिक करा. रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर तुम्हाला एक OTP मिळेल.
>> आता OTP घाला. आता सर्व EPF खात्याचा तपशील स्क्रीनवर दिसून येईल. आता आपण आपल्या पीएफ खात्यातील बॅलन्स तपासू शकता.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा