राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ रुग्णालयात दाखल

0
125
chhagan bhujbal
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मुंबईतील बॉंबे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. स्वसनाचा त्रास होत असल्याने भुजबळांवर डॉक्टरांकडून उपचार केले जात आहेत.

छगन भुजबळ यांना गेल्या 3 ते 4 दिवसांपासून स्वसनाचा त्रास होत आहे. तरीही त्यांच्याकडून दौरे व बैठकांना उपस्थिती लावली जात होती. शिर्डी येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंथन शिबिरास त्यांनी हजेरीही लावली होती. मात्र, त्यानंतर भुजबळ यांना स्वसनाचा त्रास जास्त वाढू लागल्यामुळे उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

सध्या भुजबळ यांच्यावर डॉक्ट्रांकडून उपचार केले जात असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना नुकताच डिस्चार्ज देण्यात आला आहे.