…तर संजय राऊतांवर होऊ शकतो हल्ला?; भुजबळांनी सांगितलं नेमकं कारण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बेळगाव न्यायालयाकडून ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना 2018 च्या एका प्रकरणात समन्स बजावण्यात आले आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली असून “हा त्यांचा डाव आहे. बेळगाव महाराष्ट्रात यायला हवं होतं. बेळगाव महाराष्ट्रात घेण्यासाठी गेले कित्येक वर्ष आंदोलन सुरू आहे. यासाठी आतापर्यंत 69 शिवसैनिकांनी बलिदान दिलं. राऊतांवर बेळगावात हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही,” असे भुजबळ म्हंटले आहे.

छगन भुजबळ यांनी मुंबईत आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, संजय राऊत यांना बेळगाव न्यायालयाने समन्स बजावले आहे. त्यांना तिकडे बोलवून अटक केली जाऊ शकते. त्याच्यावर कारवाई केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. बेळगाव आणि महाराष्ट्राबद्दल सांगायचे झाले तर बेळगाव महाराष्ट्रात यायला हवे होते. बेळगाव महाराष्ट्रात घेण्यासाठी गेले कित्येक वर्ष आंदोलन सुरू आहे. यासाठी आतापर्यंत 69 शिवसैनिकांनी बलिदान दिले. आम्ही जरा जास्तच लोकशाहीवादी आहोत त्यामुळे ते इकडे येऊन झेंड लावत आहेत. मात्र या प्रश्नावर आता सर्व पक्षांनी एकत्र येऊन लढायला हवे भुजबळ यांनी केले आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

संजय राऊत यांनी नुकतीच बेळगाव न्यायालयाकडून बजावण्यात आलेल्या नोटीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, मुख्यमंत्री सीमा प्रश्नावर गप्प का आहेत? कानडी संघटनांना महाराष्ट्रातून छुपा पाठिंबा आहे. पाठिंब्याशिवाय ते महाराष्ट्रात येऊन कर्नाटकचा झेंडा लावूच शकत नाही. बेळगावमध्ये बोलावून माझ्यावर हल्ला करण्याचा कट आहे. सीमाप्रश्नात गृहमंत्री अमित शाह यांनी लक्ष घालावं, अन्यथा रक्तपाताची भीती, ही जबाबदारी केंद्राची आहे. राजकारण करू नका. सीमा प्रश्नासाठी आता पुन्हा गुवाहाटीला जाऊन नवस करणार का? असा खोचक टोलाही यावेळी संजय राऊत यांनी लगावला आहे.