भाजप सरकार एकीकडे म्हणते गाईला वाचवा आणि दुसरीकडे म्हणते बाईला नाचवा – छगन भुजबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव प्रतिनिधी | आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन गृहमंत्री स्वर्गीय आर आर पाटील यांनी महत्वपूर्ण निर्णय घेत राज्यातील डान्सबारवर बंदी घातली होती. मात्र डान्स बार बंदीवर राज्य सरकारने घालून दिलेले सर्व नियम रद्द करत सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वपुर्ण निर्णय दिला असून मुंबईसह राज्यात पुन्हा डान्सबार सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी “भाजप  सरकार एकीकडे म्हणते गाईला वाचवा आणि दुसरीकडे म्हणते बाईला नाचवा’ असे म्हणून आपल्या अनोख्या शैलीत सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला. “पुन्हा छम छम बार हेच आमचे बीजेपी सरकार. अबकी बार छम छम सरकार”, अशा बोचऱ्या शब्दात भुजबळ यांनी भाजप सरकारची खिल्ली उडविली. निर्धार परिवर्तनाचा संपर्क यात्रेनिमित्त जळगाव येथे आयोजित सभेत ते बोलत होते.

‘डान्सबारवरील बंदी उठणे म्हणजे भाजप-शिवसेना सरकारचे मोठे अपयश आहे. न्यायालयात सरकारची भक्कम बाजू मांडण्यासाठी वकील नियुक्त केला नाही. त्यामुळे ही नामुष्कीची वेळ राज्यावर आली आहे’ असे म्हणून भुजबळ यांनी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. तसेच यावेळी त्यांनी जळगाव जिल्ह्यातील विकासाबाबतही सरकारला धारेवर धरले. जळगांवमध्ये भाजपला चांगले यश मिळाले. ‘इथे दोन मंत्रीही आहेत. पण विकासकामे केलीच नाहीत. भाजपाने निवडणुकीत १०० कोटी जळगांवला देण्याची घोषणा केली होती. आता तरी ते देऊन टाका!’ अशी मिश्किल टीकाही त्यांनी केली.

जळगावच्या लता परदेशी या मुलीने एका तरूणाच्या एकतर्फी प्रेमातून होणाऱ्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. या आत्महत्याग्रस्त परिवाराला न्याय मिळवून देण्याच्या प्रक्रियेत दिरंगाई सुरू आहे. या कुटुंबियांनी चाळीसगाव येथील सभेत नेत्यांची भेट घेऊन याप्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली. हे राज्य कायद्याने, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने चालणारे आहे, जे कायदा हाती घेतात त्यांच्यावर कारवाई करा, कोणावरही अन्याय झाला तर आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा भुजबळ यांनी दिला. यावेळी सभेला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी उपस्थित होते.

दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि  हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी  आजच आमचा  WhatsApp  ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729

Facebook Page – Hello Maharashtra

 

इतर महत्वाचे –

इथून लढवू शकतात रोहित पवार विधानसभा निवडणूक

रोहित पवार आगामी लोकसभेत शिवसेनेच्या आढळरावांना पुरून उरणार?

शरद पवार पुण्यातून लढवणार लोकसभा ?

Leave a Comment