‘मविआ’च्या प्रस्तावावर भाजपच्या उत्तराची वाट पाहू; फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांची प्रतिक्रिया

0
57
Chhagan Bhujbal
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. दरम्यान राज्यसभेच्या सहाव्या जागेसंदर्भात महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने नुकतीच विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यानंतर शिष्टमंडळातील नेते मंत्री छगन भुजबळ यांनी “राज्यसभेचे निवडणूक बिनविरोध करा, त्याबदल्यात विधान परिषदेची पाचवी जागा सोडणार असल्याचा प्रस्ताव आम्ही फडणवीसांना दिला आहे. आता दुपारी ३ वाजेपर्यंत वाट पाहू, आम्हाला अपेक्षा आहे कि ते योग्य निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली.

देवेंद्र फडणीस यांची मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी जाऊन महाविकास आघाडी सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. या भेटीनंतर शिष्टमंडळातील नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, आज महा विकास आघाडीतील शिष्टमंडळाने देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचीही उपस्थिती होती. आमच्यात व फडणवीसांच्या हसत हसत चांगली चर्चा झाली. आम्हाला खात्री आहे कि फडणवीस आम्ही दिलेल्या प्रस्तावर नक्कीच विचार करतील आणि योग्य काय तो निर्णय घेतील.

राज्यसभा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज माघारीची मुदत आहे. दुपारी भाजपकडून अर्ज काढून घेणार का? कि निवडणूक लढवणार, याकडे सर्वांचे ;लक्ष लागून राहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here