सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित नही- छगन भुजबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांची महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या नंतर छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर हल्लाबोल केला. सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित नही असे छगन भुजबळ यांनी ,म्हंटल.

आमच्यावर खोटे आरोप लावण्यात आले. काही लोकांना आम्हाला त्रास द्यायचा होता. आमहाला एक नवा पैसाही मिळाला नाही. यासगळ्या प्रकरणात विनाकारण मला तुरुंगवास सोसावा लागला. पण गणेशोत्सच्याआधी आमच्यावरचं संकट दूर झालं… सत्य परेशान हो सकता हैं… लेकीन पराजित नही…, असं भुजबळ म्हणाले.

जे तुमचा छगन भुजबळ करू असं म्हणत होते त्यांना कोर्टाने उत्तर दिले असं म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला. तसेच जसा मला न्याय मिळाला तसा इतरांनाही मिळेल असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांच्या ईडी कारवायांवर भाष्य केलं

Leave a Comment