वसंतदादांचा उल्लेख करत भुजबळांचा शरद पवारांवर घाव; इतिहास सुनावत दाखवला आरसा

sharad pawar chhagan bhujbal (2)
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 गट पडल्यानंतर आज मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. अजित पवार यांच्या गटाकडून आज मुंबईतील एमईटी इंस्टीट्यूटमध्ये मेळावा पार पडला. यावेळी भुजबळ यांनी वसंतदादा पाटील, बाळासाहब ठाकरे, गोपीनाथ मुंडे यांचा उल्लेख करत शरद पवारांवर हल्लाबोल केला. साहेब आज तुम्हाला वाईट वाटलं, पण पण साहेब आपण वसंतदादांना सोडलं तेव्हा त्यांना देखील असचं वाईट वाटलं अशी आठवण करून देत छगन भुजबळ यांनी शरद पवारांना आरसा दाखवला.

छगन भुजबळ म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांच्याशी मतभेद झाल्यानंतर मी शिवसेनेतून बाहेर पडलो त्यावेळी बाळासाहेब आणि माँसाहेबांना सुद्धा वाईट वाटलं असेल, पण तेव्हा तुम्ही मला तिकडेच थांबा, असे सांगितले नाही. तुम्ही धनजंय मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणले तेव्हा गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या डोळ्यातही असेच अश्रू आले असतील. येव्हडच नव्हे तर साहेब आपण वसंतदादांना सोडलं तेव्हा त्यांना देखील असचं वाईट वाटलं असं म्हणत भुजबळ यांनी शरद पवारांना इतिहासाची आठवण करून दिली.

दरम्यान, शरद पवार अजूनही आमचे विठ्ठल आहेत, पण काही बडव्यांनी त्यांना घेरलं आहे असा आरोपही छगन भुजबळ यांनी केला. साहेब त्या बडव्यांना बाजूला करा आणि आम्हाला आशिर्वाद द्यायला या, नागालँडच्या आमदारांना सत्कार केला तसं आम्हालाही पोटाशी धरा असे आवाहन छगन भुजबळ यांनी केलं. मात्र छगन भुजबळ यांच्या भाषणातील बडवा कोण? भुजबळ यांचा रोख नेमका कोणाकडे होता यावर तर्क वितर्क लावले जात आहेत.