वॉशिंग्टन । अमेरिकेतील (America) शिकागो विमानतळ (Chicago Airport) येथे एका भारतीयला पकडण्यात आले आहे. या व्यक्तीवर 3,200 व्हायग्राच्या गोळ्या अवैधरीत्या आयात केल्याचा आरोप आहे. त्यांची किंमत 96 हजार अमेरिकन डॉलर्स इतकी आहे. या व्यक्तीने असा दावा केला आहे की,” तो या गोळ्या आपल्या मित्रांसाठी घेत होता आणि भारतात या गोळ्या वैद्यकीय प्रिस्क्रिप्शनशिवाय घेतल्या जाऊ शकतात.”
एका अधिकृत निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. अमेरिकेच्या सीमाशुल्क आणि सीमा संरक्षण विभागाने (सीबीपी) शुक्रवारी प्रवाश्याचे नाव जाहीर न करता सांगितले की,” तो भारतातून अमेरिकेत परत आला आहे आणि त्याच्या सामानाच्या तपासणी दरम्यान त्याच्याकडून या गोळ्या जप्त केल्या आहेत.” या निवेदनात असेही म्हटले गेले आहे की,”एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हायग्राच्या गोळ्या आणण्याबाबत त्याला कोणतेही समाधानकारक उत्तर देता आलेले नाही, तेव्हा अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले.
सीबीपीने एका निवेदनात म्हटले आहे की, “वस्तूंच्या तपासणी दरम्यान अधिकाऱ्यांनी त्याच्याकडून सिल्डेनाफिल साइट्रेट (100 मिलीग्राम) च्या 3,200 गोळ्या जप्त केल्या. जेव्हा त्या प्रवाशाला त्याच्याकडे इतक्या गोळ्या का आहेत असे विचारले असता तो म्हणाला की, हे त्याच्या मित्रांसाठी आहे आणि असे मानले जाते की भारतात त्या डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवायही घेतले जाऊ शकतात. ”
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”