हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान काल राज्यपालांनी निवडीवर आक्षेप घेतल्याने आघाडीतील नेत्यांनीही कोणत्याही परिस्थितीत आम्ही विधानसभा अध्यक्षांच्या निवडी करणार असे म्हंटले. अध्यक्षपदाच्या निवडीवर आक्षेप घेतल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना पत्र लिहले आहे. विधिमंडळ कायदे राज्यपालांच्या अधिकार कक्षेत येत नाही, असे मुख्यमंत्री ठाकरेंनी पत्रात म्हंटले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यापालांना लिहलेल्या पत्रात म्हंटले आहे की, महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आपली भेट घेतली. तसेच विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत योग्य तो निर्णय घेऊन याला संमती द्यावी. सरकार कोणत्याही परिस्थितीत निवडणूक घेण्याबाबत ठाम आहे. कायदे मंडळाने काय कायदे केले, ते तपासण्याचा अधिकार राज्यपाल म्हणून तुम्हाला नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना ठणकवत सांगितले आहे.
दरम्यान, राज्यपालांच्या निर्णयावर काँग्रेस नेते आक्रमक झाले असून कोणत्याही परिस्थितीत अध्यक्षपदाची निवडणूक घेणार असा पावित्रा घेतला आहे. याबाबत मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही अध्यक्ष निवडीबाबत आम्ही जे केलेय ते कायदेशीर आहे. विधानसभा अध्यक्ष निवडणुकीबाबत योग्य वेळी योग्य निर्णय होईल. आम्ही कायद्याने नियम केलेले आहेत. जे लोकसभेत आहेत ते विधानसभेत केलेत, देशातील इतर सभागृहात ते नियम केलेत. कोणी कोर्टात गेले तर आम्ही आमची बाजू मांडू नक्की मांडणार असल्याचे थोरात यांनी म्हंटले आहे. दरम्यान, अध्यक्षपदाच्या निवडीबाबत आघाडीतील नेत्यांची महत्वाचीबैठक सुरु आहे.