दिवाळीत फटाके फोडा मात्र धूर काढू नका; मुख्यमंत्री ठाकरेंचा फडणवीसांना टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या महाविकास आघाडी सरकावर मधील नेत्यांवर ईडी, आयकर विभागाकडून कारवाई केली जात आहे. यावरून भाजपकडून टीका केली जात आहे. भाजप नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दिवाळीनानंतर फटाके फोडू असे सांगितले आहे. त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टोला लगावला आहे. “काहीजण म्हणत आहेत कि फटाके फोडणार आहे. त्यांना एवढंच सांगणे आहे की, फटाके फोडा मात्र धूर काढू नका. कारण कोरोना अजून गेलेला नाही, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

आज बारामतीत अटल इनक्युबेशन सेंटरचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी रश्मी ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आदींनी उपस्थिती लावली. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, “मी चांगल्या कामाच्या विकासाच्या आड कधीच येणार नाही. दिवाळीचा सण आहे. काहीजण म्हणत आहेत कि फटाके फोडणार आहे. त्यांना एवढंच सांगणे आहे की, फटाके फोडा मात्र धूर काढू नका, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, बारामती या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी चांगला बदल केला आहे. राजकारणात टीकाकार असेल पाहिजे. राजकारणात आपलं एकमेकांचे पटत नाही तर नाही. मात्र, चांगले काम करताना त्यामध्ये अनेक विघ्न आणण्याचे काम केले जात आहे. दिवाळीचा सण आहे. राजकारणात विघ्न संतोषी लोक खूप आहे, अशी टीका मुख्यमंत्री ठाकरेंनी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे नाव न घेता केली.

Leave a Comment