हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिरव्या मिरच्या खाण्याचं आपण सहसा टाळतो. कोणालाच हिरव्या मिरच्या खायला आवडत नाही. सगळेजण स्वाद येण्यासाठी फक्त हिरव्या मिरचीचा वापर पदार्थांमध्ये करतात. लहान मुलांना तर मिरची अजिबात आवडत नाही. मिरची ऐवजी लाल तिखट अथवा मसाल्यांना प्राधान्य दिलं जातं. आपल्या आहारात मिरचीपेक्षा जास्त तिखट खाण्याला प्राधान्य दिलं जातं. पण तुम्हाला हे माहीत आहे का? मिरचीचं आहारात समावेश केल्यानं हृदयविकाराचा धोका दूर टळू शकतो. मसालेदार पदार्थ खाणाऱ्यांमध्ये हृदयविकाराचा धोका अधिक असल्याचं समोर आलं आहे. पण जर आहारात जर मिरचीचा समावेश असेल तर रक्तदाब तसेच हृदयाचा त्रास हा कमी होतो.
काय आहेत मिरचीचे फायदे
— ज्यांना पित्ताचा त्रास आहे अशा व्यक्तीने लाल तिखटाऐवजी जेवणात हिरव्या मिरचीचा वापर करावा.
— हिरव्या मिरचीत असणाऱ्या कॅप्सिकोन नावाच्या घटकामुळे प्रोस्ट्रेट कॅन्सरचा धोका कमी होतो. कॅन्सरपासून बचावासाठी हिरव्या मिरचीचा वापर उपयोगी ठरतो असं सांगितलं जातं.
— मिरचीत ‘विटॅमिन ए’ आढळतं. यामुळे डोळे आणि त्वचेलाही त्याचा फायदा होतो.
— मधुमेह सारख्या गंभीर आजाराचा सामना करण्यासाठी आहारात हिरव्या मिरचीचा समावेश आवर्जून करायला हवा.
–मिरचीमध्ये व्हिटॅमिन बी-6, व्हिटॅमिन ए आणि सी भरपूर प्रमाणात असतात. लाल तिखटापेक्षा मिरची पचायला लाभदायक असते. तसेच लाल तिखटामध्ये अनेक वेगवेगळा पदार्थांचा समावेश असतो. त्यामुळे ते शरीरासाठी हानिकारक असते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.