हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चायना प्राइमरी स्कूलमधील एका सुरक्षा रक्षकाने चाकूने सुमारे ४० विद्यार्थी आणि दोन शिक्षकांवर हल्ला केला. या सुरक्षा रक्षकाने शाळेच्याच विद्यार्थ्यांना लक्ष्य का केले याची माहिती अद्यापपर्यंत मिळालेली नाही.
‘चायना डेली’ या अधिकृत वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, गुआंग्सी प्रांतातील प्राथमिक शाळेत ही घटना घडली. असं म्हणतात की, गुरुवारी सकाळी जेव्हा मुले शाळेत शिकत होती, तेव्हा शाळेच्या सुरक्षा रक्षकाने चाकू आणला आणि शाळेत उपस्थित असलेल्या मुलांवर आणि शिक्षकांवर हल्ला करण्यास सुरवात केली. सुरक्षा रक्षकांनी हल्ला केलेल्या बर्याच मुलांचे वय हे ६ वर्षाखालील आहे. या घटनेत एक विद्यार्थी, शाळेचे मुख्याध्यापक तसेच एक सुरक्षा रक्षक यांना गंभीर दुखापत झाली.
सदर घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी जखमींना तातडीने वजूहु सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले, यातील या तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी आरोपी असलेल्या सुरक्षा रक्षकास अटक केली असून त्याच्याकडे पुढील चौकशी केली जात आहे. चीनमध्ये गेल्या काही वर्षांत शाळेच्या आत चाकूने झालेल्या हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. असंतुष्ट हल्लेखोर हे त्यांचा राग रोखण्यासाठी लहान मुलांच्या शाळा किंवा बसेसला लक्ष्य करतात.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.