हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आतापर्यंत असे मानले जाते आहे की जगात कोरोनाव्हायरसची लागण चीनमधील वुहानपासून झाली आहे. संसर्ग प्रकरणांमध्ये वाढ झाल्यानंतर, असे अनेक डॉक्टर चीनमध्ये समोर आले होती ज्यांनी सरकारला कोरोना (कोविड १९) बद्दल अलर्ट केले होते पण सरकारने त्यांचे म्हणणे ऐकले नाही आरोप केला या डॉक्टरांनी केला आहे.यातीलच एक डॉक्टर एई फेन बेपत्ता झाली आहे.
डॉ. एई फेन हे जगातील पहिल्या काही लोकांपैकी एक आहेत ज्यांनी सार्वजनिकपणे कोरोनाचा इशारा दिला होता तसेच चिनी सरकारवर टीका केली होती. डेली मेलच्या वृत्तानुसार, सरकारवर टीका केल्याबद्दल तिला अटक करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. एई फेनवर चीनमधील कोरोनाशी संबंधित गुप्त अहवाल सार्वजनिक केल्याचा आरोप आहे.
हा अहवाल सार्वजनिक केल्यानंतर तिला सतत धमक्या मिळत होत्या.डॉक्टर एई यांनी सांगितले होते की वुहान सेंट्रल हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी केवळ त्यांची बदनामी केली नाही तर त्यांच्या बरोबर काहीतरी वाईट घडू शकते अशी धमकीही दिली होती असा आरोपही एईने केला होता. डॉ एईच्या अगोदर आणखी एक चिनी डॉक्टर ली वेलियांग यांनीही कोरोना विषाणूबाबत चीनी सरकारच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. चिनी अधिकाऱ्यांनी या दोन्हीही डॉक्टरांना इशारा दिला की त्यांनी कायद्याचा भंग केला आहे आणि बेकायदेशीरपणे चुकीची माहिती ऑनलाईन प्रसारित केली आहे. डॉ एई यांनी मासिकाला एक मुलाखत दिलीआणि त्यानंतरचा ती गायब झाली
डॉ. एई यांनी चीनमधील एका मासिकाला मुलाखत दिली ज्यामध्ये त्यांनी सरकारच्या कोरोना प्रतिबंधक कार्यक्रमावर टीका केली. एई म्हणाले की, रुग्णालय व्यवस्थापनाने आपल्या स्तरावर याकडे योग्य लक्ष दिले नाही किंवा चीनी सरकारला योग्यरित्या माहिती दिली नाही. डॉ. एई बेपत्ता झाल्यानंतर पुन्हा चिनी सरकारवर प्रश्न निर्माण झाले आहेत.
अमेरिका आणि इतर देशांनी चीन सरकारवर कोरोनाशी संबंधित माहिती लपवल्याचा आरोप केला आहे. वुहानच्या स्थानिक लोकांचा असा विश्वास आहे की चीनी अधिकाऱ्यांचा हा दावा चुकीचा आहे आणि कोरोनाने इथं ४२ हजारांहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले आहेत, तर चीनी सरकारच्या म्हणण्यानुसार ही संख्या केवळ ३२०० आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’
हे पण वाचा –
मुंबई ‘वुहान’ होण्याच्या मार्गावर? ५ हजारपेक्षा जास्त लोक कोरोनाबाधितांच्या संपर्कात
राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३२१ वर, मुंबईत १६ तर पुण्यात २ नवे रुग्ण
खुशखबर! विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमती झाल्या आणखी कमी
कोरोनाने जगभरात ४० हजार जणांचा मृत्यू, ८ लाखांहून अधिक जण बाधित
निजामुद्दीन मरकजचे ‘महाराष्ट्र कनेक्शन’; आरोग्य यंत्रणेची झोप उडाली
‘या’ भारतीय महिलेने इटलीची केली पोल-खोल, केला खळबळजनक खुलासा