नवी दिल्ली । नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) मधील अनियमिततेमुळे स्टॉक एक्स्चेंजच्या माजी एमडी आणि सीईओ चित्रा रामकृष्ण यांच्या अडचणी वाढत असल्याचे दिसत आहे. इनकम टॅक्स डिपार्टमेंटच्या छापेमारीनंतर आता CBI ने चित्रा यांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. CBI ने शुक्रवारी चित्रा यांची चौकशी केली. तपास एजन्सीने रामकृष्ण आणि आणखी एक माजी सीईओ रवी नारायण आणि सीओओ आनंद सुब्रमण्यन यांना देश सोडण्यापासून रोखण्यासाठी लूक आउट सर्क्युलर जारी केले आहे.
बाबांच्या प्रभावाखाली निर्णय घेण्याचे प्रकरण
11 फेब्रुवारी 2022 रोजी, देशाच्या बाजार नियामक सेबीने सांगितले की, हिमालयात फिरणाऱ्या एका योगीच्या प्रभावाखाली त्यांनी आनंद सुब्रमण्यन यांची एक्सचेंजचे सीओओ आणि एमडी म्हणून नियुक्ती केली होती तेव्हापासून चित्रा यांचे नाव चर्चेत आले. सेबीने चित्रा आणि इतरांवर सुब्रमण्यन यांची मुख्य धोरणात्मक सल्लागार म्हणून नियुक्ती आणि नंतर त्यांची ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर आणि एमडीचे सल्लागार म्हणून पुनर्नियुक्ती करताना नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. सेबीने रामकृष्णन यांना 3 कोटी रुपये, NSE आणि त्यांचे माजी एमडी आणि सीओओ रवी नारायण आणि सुब्रमण्यन यांना प्रत्येकी 2 कोटी रुपये आणि मुख्य नियामक आणि तक्रार अधिकारी व्हीआर नरसिंहन यांना 6 लाख रुपये दंड ठोठावला आहे.
चित्रा रामकृष्ण व्यवसायाने CA आहेत
चित्रा व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट (CA) आहे. त्यांनी 1985 साली IDBI बँकेतून आपल्या करिअरची सुरुवात केली. काही काळ सेबीमध्येही काम केले. 1991 मध्ये NSE सुरू झाल्यापासून त्या मुख्य भूमिकेत होत्या.
2013 मध्ये NSE प्रमुख बनल्या
‘हर्षद मेहता घोटाळा’ प्रकरणा नंतर पारदर्शक स्टॉक एक्स्चेंज तयार करण्यासाठी निवडलेल्या पाच लोकांमध्ये NSE चे पहिले सीईओ RH पाटील यांच्या नेतृत्वाखालील चित्रा यांचा समावेश होता. 2013 मध्ये रवि नारायण यांचा कार्यकाळ संपल्यानंतर चित्रा यांना 5 वर्षांसाठी NSE चे प्रमुख बनवण्यात आले.
आनंद सुब्रमण्यम यांचा पगार 15 लाखांवरून 1.38 कोटींवर आला आहे
असा आरोप आहे की, चित्रा यांनी पदभार स्वीकारताच NSE मध्ये सीओओ पद बनवले आणि हिमालयातील एका बाबाच्या प्रभावाखाली आनंद सुब्रमण्यम यांची नियुक्ती कर्नाय्त आली. चित्राने आनंद सुब्रमण्यम यांचा पगार 15 लाखांवरून वार्षिक 1.38 कोटी रुपये केला. यापूर्वी आनंदचा पगार 15 लाख रुपये होता.