व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

“मुंबईतील लोकलला अत्याधुनिक आणि नवीन रुप देणार”; पंतप्रधान मोदींची घोषणा 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ठाणे ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गीकेचे लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन माध्यमातून पार पडले. यावेळी केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे याची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी “मुंबईचं सामर्थ्य वाढवण्यासाठी आपलं सरकार प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईतील लोकलला अत्याधुनिक आणि नवीन रुप देणार आहे,” अशी घोषणा पंतप्रधान मोदींनी केली.

लोकार्पण सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाइनच्या माध्यमातून उपस्थिती लावली. यावेळी ते म्हणाले की, ” आज लोकार्पण करण्यात आलेल्या या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेमुळे अनेक फायदे होणार आहेत. लोकल आणि एक्प्रेससाठी वेगवेगळ्या लाईन होतील, इतर राज्यांतून येणाऱ्या गाड्यांना थांबावं लागणार नाही. “आत्मनिर्भर भारता’मध्ये मुंबईचे योगदान वाढावे यासाठी या शहरात अत्याधुनिक सुविधा मिळाव्यात यासाठी केंद्र सरकार प्रयत्न आहे.

ठाणे ते दिवा पाचव्या सहाव्या मार्गिकेचे काम गेली दहा वर्षे रखडले होते. मार्च 2019 अंतिम मुदत असतानाही त्यात अनेक वेळा बदल झाला होता. त्यानंतर जून 2021 ही अंतिम मुदत ठरवण्यात आली होती. मात्र, कोरोना आणि लॉकडाऊनमुळे कमी मनुष्यबळ आणि अन्य तांत्रिक कारणांमुळे या कामात पुन्हा अडथळा आला.