हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आ. रवि राणा दाम्पत्यावरील कारवाईनंतर भाजपाच्या महिल्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला आहे. ज्या दिवशी तुमच्या हातून सत्ता जाईल त्यादिवशी विनातक्रार परतफेड करायला तयार रहा…तीही व्याजासह..! असे ट्विट करण्यात आले आहे. मात्र, या ट्विटनंतर चित्रा वाघ यांना जोरदार ट्रोल करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसापूर्वी शिवसेना नेते कुचिक प्रकरणात पिडीत तरूणीने चित्रा वाघ यांच्यावरच आरोप करण्यात आले. त्यानंतरही आपण सत्य व महिलांच्या पाठीशी असल्याचे म्हटले. आता खा. नवनीत राणा व त्याचे पती रवि राणा याच्याबाबत काही मिनिटांतच तीन ट्विट करत महाविकास आघाडी सरकारला प्रश्न विचारले आहेत.
राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा आरोप?
सत्तेचा अमरपट्टा घेऊन आपण आलो आहोत असा जर तुमचा गोड गैरसमज असेल तर तुम्हीही इथे आहात आणि आम्हीही इथे आहोत…
ज्या दिवशी तुमच्या हातून सत्ता जाईल त्यादिवशी विनातक्रार परतफेड करायला तयार रहा…तीही व्याजासह..!— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) April 24, 2022
चित्रा वाघ यांनी खा. नवनीत राणा या महिला असून त्याच्यावर अन्याय होताना सरकार पक्षातील महिलांना प्रश्न केला आहे. त्या ट्विट्मध्ये म्हणतात, महिलांच्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवणाऱ्या सत्तेच्या परिघातल्या महिला नेत्या कुठे मूग गिळून बसल्यात ?? की विरोधात असलेल्या महिलेवर झालेला सरकारी अत्याचार चालतो ?? लाखो मतदारांची महिला लोकप्रतिनीधीला रात्रभर लॉकअप मध्ये ठेवलंय.. डोळ्यावर कातडं ओढून बिळात शिरणाऱ्यांनो बाहेर पडा…
महिलांच्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवणाऱ्या सत्तेच्या परिघातल्या महिला नेत्या कुठे मूग गिळून बसल्यात ??
की विरोधात असलेल्या महिलेवर झालेला सरकारी अत्याचार चालतो ??लाखो मतदारांची महिला लोकप्रतिनीधीला रात्रभर लॉकअप मध्ये ठेवलंय..
डोळ्यावर कातडं ओढून बिळात शिरणाऱ्यांनो बाहेर पडा…— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) April 24, 2022
परंतु त्याच्या या ट्विट्ववर नेटकऱ्यांनी भाजपचे नेते गणेश नाईक यांच्याबाबत प्रश्नाचा भडीमार केला आहे. गणेश नाईक यांच्या प्रकरणात तुम्ही किती ट्विट केले, ताई तुम्हांला गणेश नाईक दिसले का असे अनेक प्रश्न ट्विट्ववर विचारले आहेत.
हनुमानचालीसा म्हणायचा संकल्प करणाऱ्या महिलेच्या विरोधात राजद्रोहाचा गुन्हा…
एका दाम्पत्याला सत्तेचा गैरवापर करत रात्रभर लॉकअप मध्ये ठेवलं ही ठाकरे सरकारची मर्दानगी ?
अरे एका बाईच्या विरोधात ताकद दाखवताय लाज बाळगा
ती ही पूरूनचं उरली तुम्हाला..पुर्ण शिवसेना रस्त्यावर उतरवली तीने..— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) April 24, 2022