येत्या दिवाळीत निवडा सर्वोत्कृष्ट बचत योजना; SSY, PPF, SCSS आणि KVP मधील सर्वोत्तम पर्याय कोणता आहे ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भारत सरकारकडून अनेक Small Savings Schemes चालवल्या जात आहेत. सरकार दर तिमाहीत या बचत योजनांवरील व्याजदरातही बदल करते. या लहान बचत योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास 4 ते 7.6 टक्के व्याज मिळते. आज आम्ही तुम्हांला अशा काही बचत योजनांबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्हाला गॅरेंटेड रिटर्न मिळू शकतो.

या योजनांमध्ये किसान विकास पत्र (KVP), ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS), सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) आणि सुकन्या समृद्धी योजना यांचा समावेश आहे. जर तुम्हीही यापैकी कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आधी जाणून घ्या की त्यावर किती व्याज आहे.

सुकन्या समृद्धी योजना (SSY)
ही योजना फक्त 10 वर्षांपर्यंतच्या मुलींसाठी आहे आणि खूप लोकप्रिय आहे. यावरील नवीन व्याजदर 1 एप्रिल 2021 पासून म्हणजेच आजपासून लागू होतील. सध्या त्यावर 7.6 टक्के व्याज मिळत आहे. या योजनेत एखादी व्यक्ती आपल्या दोन मुलींसाठी खाते उघडू शकते. वयाच्या 21 व्या वर्षी मुली या खात्यातून पैसे काढू शकतात. या योजनेत 9 वर्षे 4 महिन्यांत रक्कम दुप्पट होईल.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF)
PPF ही सर्वात लोकप्रिय कर बचत योजना आहे. त्यात केलेली गुंतवणूक 15 वर्षांत मॅच्युर होते. PPF गुंतवणुकीत 5 वर्षांचा लॉक-इन पिरिअड असतो. यामध्ये किमान 500 रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येईल. सध्या यामध्ये 7.1 टक्के व्याज दिले जात आहे.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS)
60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेली लोकं त्यांच्या आयुष्यात 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करून नियमित उत्पन्न मिळवू शकतात. या योजनेत ज्येष्ठ नागरिक पती-पत्नी मिळून 30 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करू शकतात. त्याचे लॉकइन 5 वर्षांचे आहे म्हणजेच 5 वर्षांपर्यंत पैसे काढता येत नाहीत. सध्या यावर 7. 4 टक्के व्याज दिले जात आहे.

किसान विकास पत्र (KVP)
किसान विकास पत्रामध्ये किमान 1000 रुपयांमध्ये खाते उघडता येते. त्यावर सध्या 6.9 टक्के वार्षिक व्याज मिळत आहे. किसान विकास पत्रामध्ये असे वचन दिले आहे की तुमची गुंतवणूक 10 वर्ष 4 महिन्यांत दुप्पट होईल.

Leave a Comment