योग दिवस विशेष | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग गुरु रामदेव बाबा यांच्या समवेत नांदेड मध्ये योग दिन साजरा केला आहे. या वेळी त्यांच्या समवेत नांदेडचे नवनिर्वाचित खासदार प्रताप पाटील चिखलीकर उपस्थितीत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामदेव बाबा ज्या प्रमाणे सांगतील त्याप्रमाणे योग साधना केली आहे. त्याच प्रमाणे उपस्थित जण सागराने देखील या दोन बड्या हस्तीसोबत योग साधना करून योग दिन साजरा केला आहे.
ब्रेकिंग | सुजय विखे ,सदाशिव लोखंडेंची खासदारकी जाणार!
Few more glimpses from #InternationalYogaDay program at Nanded by GoM & Patanjali YogaPith #YogaDay2019#InternationalDayOfYoga pic.twitter.com/Avs4nHF0oF
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 21, 2019
नांदेड येथे आयोजित केलेला योग दिनाचा कार्यक्रम हा राज्य सरकारने आयोजित केलेला कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल रात्री उशिरा नांदेड मध्ये दाखल झाले. त्यावेळी त्यांचे प्रताप पाटील चिखलीकर यांनी स्वागत देखील केले. त्यानंतर आज सकाळी लवकर मुख्यमंत्री योग साधनेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते.
राष्ट्रपतींचे अभिभाषण :राहुल गांधी मोबाईल चाटिंगमध्ये व्यस्त
राज्य शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला योग दिनाचा कार्यक्रम नांदेड या शहरातच का घेण्यात आला होता. याला देखील राजकीय कंगोरे आहेत का या बद्दल राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. विरोधकांच्या गडांवर हल्ला करून निवडणुकीत भरगोस यश मिळवायचे असा मनसुबा भाजपने लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनच आखला आहे. त्याचाच एक भाग म्हणून योग दिनाचा कार्यक्रम नांदेड येथे आयोजित करण्यात आला असावा.