कोल्हापूर प्रतिनिधी | पूर परिस्थिती अत्यंत बिकट बनली आहे. सरकार यावर मात करण्याचा प्रत्येक प्रयत्न करत आहे. तरी विरोधकांची सरकार जिथं कमी पडतंय तिथं सरकारला सांगावे याचे राजकारण करू नये असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
पूर परिस्थिती बिकट आहे. अद्याप पूर ओसरेल असे दिसत नाही. पुढील काही दिवस अशीच स्थिती कायम राहील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्याच प्रमाणे याचे कोणी राजकारण करू नये कारण सध्या जी परिस्थिती उदभवली आहे त्याच्याशी सामना करण्याचे काम आपण सर्व मोठ्या ताकदीने करूया. कर्नाटक सरकारशी आपला संवाद आहे. पूरपरिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कर्नाटकाने महाराष्ट्राला मदत करण्याचे पूर्ण आश्वासन दिले आहे. अलमट्टी धरणातून पाणी सोडण्याच्या दृष्टीने आपण कर्नाटक सरकारला बोललो आहे. त्यावर ते सरकार लवकरच निर्णय घेईल असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
दरम्यान ब्रम्ह नळी येथे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १२ वर पोचल्याचा निर्वाळा देखील मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. तसेच पुरात मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबियांना महाराष्ट्र सरकारच्या वतीने ५ लाख रुपयांची मदत दिली जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हणले आहे. पूर्वस्थितीची पाहणी करण्यास गेलेले नेते राजकारण करत असल्याचे आपल्या निदर्शनाला आले आहे त्यांना माझे सांगणे आहे की परिस्थिती अत्यंत गंभीर आहे त्यामुळे तुम्ही या परिस्थितीचे राजकारण करू नये असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.