मुंबई प्रतिनिधी | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थळाला मुंबई महापालिकेने डिफॉल्टर यादीत टाकले आहे. याच मुद्द्यावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आक्रमक झाल्याचे दिसले. जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांची थकीत पाणीपट्टी आपण भरणार असल्याचे बोलले आहे. कारण मुख्यमंत्र्यांना अंघोळ करायला आणि तोंड धुण्यास उशीर झाला तर सगळ्या कामाला उशीर होईल असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे.
मुख्यमंत्र्यांची पाणी पट्टी कितीही असली तरी ती मी चेकने भरणार आहे. कारण मुख्यमंत्री आम्हा सर्वांचे नेते आहेत आणि राज्याची त्यांच्यावर जबाबदारी आहे. त्यांना अंघोळीला पाणी कमी पडू नये आणि त्यांना तोंड धुण्यास विलंब लागू नये म्हणून आपण त्यांची पानपट्टी चेकने भरणार आहे. कारण त्यांच्या अंघोळीला उशीर झाला तर राज्याची कामे खोळंबून राहतील असा सणसणीत टोला जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.
मुख्यमंत्री नव्हे तर मंत्री मंडळातील अनेक मंत्र्यांच्या घराच्या पाणीपट्ट्या थकीत आहेत. या संदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी माहितीचा अधिकार वापरून या संदर्भातील माहिती काढली आहे. त्यात हि धक्कादायक माहिती समोर आली आहे.