पंढरपूर प्रतिनिधी | आमदार भारत भालके यांच्या घरी मुख्यमंत्र्यांनी जाऊन त्यांचा पाहुणचार घेतल्याने काँग्रेसच्या गोटात चिंतेचे ढग निर्माण झाले आहेत. आमदार भारत भालके भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेला आता या प्रसंगामुळे अधिकच जोर चढणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबत यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्यमंत्री विजयकुमार देशमुख, माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
भारत भालके यांचा विठ्ठल शुगर हा कारखाना सध्या डफघाईला आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील राजकारण हे साखर उद्योगावर बरेचसे अवलंबून आहे. त्यामुळे भालके आपला कारखाना वाचवण्यासाठी आणि सोलापूर जिल्ह्यातील सक्रिय भाजप लाटे पासून बचाव करण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जाते आहे. सध्या पंढरपुरता भाजपला तसा तगडा उमेदवार नाही. त्यामुळे भालकेंना भाजपमध्ये आणून त्यांना भाजपचा उमेदवार करण्याचा घाट भाजप घालू शकते.
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या घरी दिलेली भेट हि सदिच्छा भेट होती. या भेटीचा आणि राजकारणचा काहीच संबंध नाही असा निर्वाळा भारत भालके यांनी दिला आहे. मात्र त्यांनी दिलेले हे स्पष्टीकर फार काळ नटीकणारे आहे असे राजकीय जाणकार म्हणत आहेत. तसेच काल भारत भालके मुख्यमंत्र्यांच्या स्वागत करण्यासाठी सोलापूर विमानतळावर गेले असता त्यांना भाजपच्या पदाधिकाऱ्यानी मुख्यमंत्र्यांना भेटू दिले नाही. म्हणून भारत भालके नाराज आहेत. अशा बातम्या आजच्या वृत्तपत्रात छापून आल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी भालकेंचा अनादर नकरता त्यांचा मान राखला अशी देखील चर्चा आज पंढरपुरात सुरु आहे.